नाले सफाईची कामे आठवडाभरात पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:34+5:302021-06-03T04:20:34+5:30

यावेळी उपायुक्त विशाल वाघ, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सहायक आयुक्त शीतल वाकडे, सहायक आयुक्त विद्या पाटील, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) ...

Complete drain cleaning work within a week | नाले सफाईची कामे आठवडाभरात पूर्ण करा

नाले सफाईची कामे आठवडाभरात पूर्ण करा

googlenewsNext

यावेळी उपायुक्त विशाल वाघ, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सहायक आयुक्त शीतल वाकडे, सहायक आयुक्त विद्या पाटील, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अमोल शेळके, स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार, झोन १ चे मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, मुख्य स्वच्छता निरीक्षक उदय मैलारपवार, झोन २ चे मुख्य स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विवेक पोतुनरवार, झोन ३ चे स्वच्छता निरीक्षक महेंद्र हजारे, स्वच्छता निरीक्षक अनिरुद्ध राजूरकर उपस्थित होते.

पावसामुळे वसाहती व झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते. घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व नाले, ड्रेनेजलाइन साफसफाई करणे व इतर सुविधा आणि उपाययोजना करण्याचे काम महिनाभरापासून सुरू आहे. सध्या ८० टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित कामे आठवडाभरात पूर्ण करावे. नाले सफाईसाठी आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढविणे, पहिला पाऊस येण्यापूर्वी गाळ उचलणे, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फवारणी करणे, गरजेनुसार फॉगिंग मशीन वाढविण्याच्या सूचना उपायुक्त विशाल वाघ दिल्या. झोन एकमध्ये मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्याची सफाई प्रगतिपथावर आहे. सिव्हिल लाइन्स, नागपूर रोड येथील सफाई पाच दिवसांत पूर्ण होईल. मेडिकल कॉलेज ते जयश्रीया लॉनपर्यंतच्या नाल्याची सफाई, बाबू पेठ, आंबेडकर वॉर्ड येथील अपूर्ण कामे ५ दिवसांत पूर्ण होतील, अशी माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षकांनी बैठकीत दिली.

स्वच्छता न झाल्यास तक्रार करा

शहराच्या मुख्य मार्गावर मोकाट कुत्रे, डुक्कर, गाढव व अन्य जनावरांमुळे रस्त्याने चालताना नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी बंदोबस्त करावा. त्यासाठी मनुष्यबळ नियुक्त करून कारवाई करण्याच्या सूचना उपायुक्त वाघ यांनी दिल्या. ज्या भागात नाले सफाई झाली नाही, असे निदर्शनास आल्यास नागरिकांनी मनपा स्वच्छता विभागात लेखी तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Complete drain cleaning work within a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.