रखडलेली पाणी पुरवठा योजना पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:01 PM2018-02-03T23:01:58+5:302018-02-03T23:02:46+5:30

जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस पडल्याने जलसंकटाची शक्यता आहे. त्यामुळे दुर्गम भाग आणि फ्लोराईड प्रदूषित गावांतील रखडलेल्या योजना तातडीने पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य सभागृहात शनिवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते

Complete the dried water supply scheme | रखडलेली पाणी पुरवठा योजना पूर्ण करा

रखडलेली पाणी पुरवठा योजना पूर्ण करा

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हाधिकारी कार्यालयात विकासाचा आढावा

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस पडल्याने जलसंकटाची शक्यता आहे. त्यामुळे दुर्गम भाग आणि फ्लोराईड प्रदूषित गावांतील रखडलेल्या योजना तातडीने पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य सभागृहात शनिवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते
यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, वरोºयाचे नगराध्यक्ष अहतेशाम अली, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी शिवदास, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा परिषद सभापती अर्चना जिवतोडे उपस्थित होते. पाणी पुरवठा, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मामा तलाव, प्रधानमंत्री खनिज विकास निधी, कृषी, पशुसंर्धन जीवन प्राधिकरण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, मुख्यमंत्री पेयजल योजनांचा आढावा घेण्यात आला. ना. अहीर म्हणाले, जिल्ह्यात ७१ योजना रखडल्या आहेत. यातील काही योजना उन्हाळयात सुरू व्हावे, यासाठी कार्यकारी अभियत्यांनी पुढील १५ दिवसात कार्यवाही करावे.
करंजी येथील सरपंच ज्योती जिजकरे यांनी वडकोली, जोगापूर, करंजी आदी गावांतील पाणी टंचाईचे वास्तव मांडले. आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी पाण्याचे नवे स्त्रोत शोधण्यामध्ये दिंगाई होत असल्याचे निर्देशनास आणून दिले. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. मामा तलावाच्या उपयोगीता आणि पूर्णक्षमतेने सुरु करण्याबाबतच्या शक्यतेवरही यावेळी चर्चा झाली. या संदर्भात सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यात ४९३ पैकी ११४ मामा तलाव पूर्ण क्षमतेने सुरु असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी प्रतिनिधी, सरपंच व सभापती वंदना पिंपळशेडे, विद्या कांबळे, रोहनी देवतळे, पुजा डोहणे, छाया शेंडे, दीपक सातपुते, सुनील सुपारे, श्याम रणदिवे, रजनी भडके उपस्थित होते.
कृषी विभागाचा निधी खर्च करा
कृषी विभागाच्या अखर्चित निधी तातडीने संबंधित योजनांवर खर्च करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिले. कृषी योजनांची अंमलबजाणी करण्यासाठी कृषी सहाय्यक, कृषिमित्रांनी संयुक्त प्रयत्न करावे. दुभत्या जनावंराची संख्या वाढविण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी सूचनाही बैठकीत केली.

Web Title: Complete the dried water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.