विहित कालावधीत उद्दिष्ट पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:24 AM2019-05-06T00:24:14+5:302019-05-06T00:25:11+5:30
राज्यामध्ये चंद्रपूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या विकासाकरिता असलेल्या चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून विविध विभागाच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यामध्ये चंद्रपूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या विकासाकरिता असलेल्या चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून विविध विभागाच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आढावा घेतला. मागास जिल्ह्याच्या विकासासाठी ही योजना असून या योजनेतून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाची पूर्तता व गेल्या वर्षाच्या प्रकल्पाची पूर्तता तातडीने करावी, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाने चांदा ते बांदा योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाकरिता अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येत आहे. या निधीच्या माध्यमातून विविध विभागांमार्फत नाविन्यपूर्ण कामे पार पाडली जात आहे. अशा विविध विभागांच्या वेगवेगळ्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. यामध्ये टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासाकरिता राबवत असलेल्या समृद्ध किसान योजनेचा आढावा घेण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून शेतकºयाांना जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयामार्फत सिंचन विहीर, सामूहिक सिंचनासाठी विहीर आणि शेततळे, कृषी यंत्रे व अवजारे, पॉलिहाऊस, शेडनेट, मल्चिंग, ठिंबक सिंचन, जलसंधारण व पाणीपुरवठा विभागातर्फे कूपनलिका अशा विविध घटकांचा लाभ देण्यात येतो. तर पशुसंवर्धन विभागामार्फत उस्मानाबादी बोकड, पर्यटन विभागाच्या माध्यमातून पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून सौंदर्यीकरणाचे विविध कामे, पाटबंधारे विभागाची कामे, विविध विभागाचे विविध कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाºयांनी विहित कालमयार्देत कामे पूर्ण करावीत, विकास कामांच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण तात्काळ काढावे, जनसामान्यांच्या गरजेच्या दृष्टिकोनातून योजनेची आखणी करावी, निवडलेल्या संपूर्ण लाभार्थ्यांची यादी अद्यावत करून ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावी, असे निर्देश उपस्थित अधिकाºयांना दिले.
कामे सोपवण्यात आलेली नोडल एजन्सी व देखरेख यंत्रणांनी नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यक्रम आखून सर्व प्रस्ताव पूर्ण करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी चांदा ते बांदा योजना सुनील धोंगळे, वन विकास विभागाचे गजेंद्र हिरे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग दशरथ पिपरे, शाखा अभियंता पाटबंधारे विभाग एस. सोनेकर, वी. ओचावार, खादी ग्रामोद्योग मंडळाचे भास्कर मेश्राम, आत्मा प्रकल्प संचालक रवींद्र मनोहरे, जलसंधारण विभाग कार्यकारी अभियंता एन. बावांगडे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.