‘हॅलो चांदा’वरील प्रलंबित तक्रारी पूर्ण निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 11:37 PM2017-09-03T23:37:43+5:302017-09-03T23:39:39+5:30

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ‘हॅलो चांदा’ या चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री तक्रार निवारण केंद्राच्या कामात आणखी गती वाढविण्यात यावी.

Complete the pending complaint on 'Hello Chanda' | ‘हॅलो चांदा’वरील प्रलंबित तक्रारी पूर्ण निकाली काढा

‘हॅलो चांदा’वरील प्रलंबित तक्रारी पूर्ण निकाली काढा

Next
ठळक मुद्देगती वाढविण्याचे निर्देश : पालकमंत्र्यांनी घेतला विभागवार आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ‘हॅलो चांदा’ या चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री तक्रार निवारण केंद्राच्या कामात आणखी गती वाढविण्यात यावी. केवळ तक्रारी सोडविण्याचे आश्वासन नव्हे तर सामान्य माणसाच्या चेहºयावर हसू फुलविण्याचे कौशल्य या टोल फ्री क्रमांकामध्ये असले पाहिजे, अशा शब्दात या नव्या प्रयोगाला देशात लोकप्रिय करण्याचे आवाहन वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्ह्याच्या प्रशासनात रुजू झालेल्या नव्या नियोजन भवनात ‘हॅलो चांदा’ या अभिनव प्रयोगाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाभरातील उच्चपदस्थ अधिकाºयांची सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिकाºयांची, या योजनेसाठी काम करणाºया तज्ञांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी १५ जुलैला सुरु झालेल्या अभिनव प्रयोगाचा आढावा यावेळी सादर केला.
आतापर्यंत जवळपास पाच हजारावर नागरिकांनी हॅलो चांदावर संपर्क साधला आहे. नागरिकांमध्ये आपल्या सोयी सुविधांविषयी जागृता निर्माण होत आहे. या योजनेमध्ये काही अधिकाºयांनी झोकून देवून काम केले. तथापि अनेक ठिकाणी तक्रारी सोडविण्याची प्रक्रिया दिर्घकाळ रेंगाळत राहिल्याचेही त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी या नव्या प्रयोगातील सहभागाबद्दल अधिकाºयों कौतुक केले. केवळ कार्यवाही सुरु केली, हे दाखविण्यासाठी ‘हॅलो चांदा’ सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे ज्या अधिकाºयांनी तक्रारी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला नाही किंवा ज्यांच्याकडून तक्रारी सोडविण्यात विलंब होत आहे, अशा अधिकारी, कर्मचाºयांवर गंभीरतेने कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला आ. नाना शामकुळे, अ‍ॅड.संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक नियति ठाकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते.
१ हजार ७४६ तक्रारी
दीड महिन्यामध्ये १७४६ तक्रारीपैकी ७५९ तक्रारी सोडविण्यात आल्या. उर्वरित तक्रारी महिन्याच्या आत सोडवण्याच्या अटीवर पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यापूर्वी अनेक लोकांचे मला शासकीय कामासाठी प्रत्यक्ष फोन येत होते. त्यांना प्रशासकीय कामासाठी ‘हॅलो चांदा’ ही एक दुसरी हेल्पलाईन निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसात प्रशासकीय कामासाठी थेट ‘हॅलो चांदा’ वरच समाधान होते. जिवतीपासून चिमूरपर्यंत सर्वसामान्य लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. पाच हजार लोकांना आपल्या कामांसाठी या यंत्रणेवर मोबाईल करावा वाटले. याचा अर्थ नागरिकांच्या समस्या आणखी जोमाने सोडविण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Complete the pending complaint on 'Hello Chanda'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.