जलयुक्तची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2017 12:38 AM2017-05-06T00:38:54+5:302017-05-06T00:38:54+5:30
राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेचे कामे व जलसंधारणाची, विहिरीची विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहेत.
संजय धोटे : राजुरा येथे आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेचे कामे व जलसंधारणाची, विहिरीची विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहेत. गावाच्या एकोप्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. जलयुक्त शिवार योजनेची रखडलेली कामे तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश आ. अँड .संजय धोटे यांनी दिले.
राजुरा तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत आ. धोटे बोलत होते. जलयुक्त शिवाराची कामे अधिक चांगले प्रकारे करण्याकरिता गावकऱ्यांना सोबत घेऊन नियोजन करावे. त्याची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतला व पंचायत समितीला देणे अनिवार्य आहे. जलयुक्त शिवार योजनतून सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल, असे सांगून त्यांनी इतर विभागाचा आढावा घेत प्रलंबित कामे, रोजगार हमी योजना, जवाहर सिचन योजना, प्रमुख ग्रामीण रस्त्याची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मंचावर राजुरा, कोरपना, जिवती पंचायत समितीचे सभापती व उपसभापती, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती, तसेच सपूर्ण जिल्हा परिषद सदस्य, प.स.सदस्य, अशासकीय कमेटीचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.
राजुरा तालुक्याचा आढावा
राजुरा तालुक्यातील सर्व विकास कामांचा आढावा व नियोजनबाबत गटांतर्गत सर्व कार्यकारी यंत्रणा प्रमुख व योजना राबविणारे अधिकाऱ्यांची सभा आ. अॅड. धोटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत त्यांनी कृषी विभाग, बांधकाम विभाग, स्वच्छ भारत मिशन, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, पंचायत विभाग, पाणी टंचाई नळ योजनेची, आरोग्य विभाग, आदी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण तालुक्याचा विकास आढावा घेतला. जे अधिकारी काम योग्यरीत्या करीत नसतील, त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.