बांबू प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे काम नियोजनानुसार पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:38 PM2018-01-24T23:38:56+5:302018-01-24T23:39:29+5:30

चंद्रपुरातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तनाचे केंद्र बनणार असून, जिल्ह्यातील आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.

Complete the work of building the bamboo training center on the plan | बांबू प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे काम नियोजनानुसार पूर्ण करा

बांबू प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे काम नियोजनानुसार पूर्ण करा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : आढावा बैठकीत दिले निर्देश

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपुरातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तनाचे केंद्र बनणार असून, जिल्ह्यातील आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नियोजित वेळेत संशोधन केंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण करा, असे निर्देश वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिले.
मुख्य वनसंरक्षक कार्यालयात बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकाम आढावा बैठकीत ते बोलत होते़ बैठकीला मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, अधिक्षक अभियंता डी. के.ब् ाालपांडे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल आदी उपस्थित होते. ना़ मुनगंटीवार म्हणाले, इमारतीचे बांधकाम बांबूपासून होणार आहे़ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इमारतींचे काम करणाºया कंपनीला ही जबाबदारी देण्यात आली़
नियमित बांधकामाऐवजी बांबूच्या वापरातून बांधकाम होत आहे. त्यामुळे कौशल्यपूर्ण बांधकामाला नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने दक्षता घ्यावी़ दर आठवड्यात बांधकामाचे निरीक्षण करावे, असेही ना़ मुनगंटीवार यांनी सूचना केली़ महाराष्ट्रातील शासकीय इमारतीचे बांधकाम पर्यावरणपूरक असावे़ विजेचा कमी वापर व्हावा, असे धोरण जाहिर केले होते.
त्यामुळे चंद्रपुरात बांधण्यात येणारी ही इमारत पर्यावरणपूरक व हरीत इमारत म्हणून पुढे यावी़ कामात कसूर करू नये़ बांबू संशोधन केंद्राने विपणनाच्या क्षेत्रात जोमाने कार्य करून विविध उपक्रमांची व्याप्ती वाढवावी, असे मत ना़ मुनगंटीवार यांनी व्यक्त केले़ यावेळी पाटील यांनी बांबू प्रशिक्षण केंद्रातील अभ्यासक्रम व प्रशिक्षणाविषयी माहित सादर केली़

Web Title: Complete the work of building the bamboo training center on the plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.