ग्रामज्योती योजनेची कामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:41 AM2018-07-06T00:41:57+5:302018-07-06T00:42:40+5:30

ग्रामीण भागातील प्रत्येकांच्या घरात विजेची सोय व्हावी, यासाठी महत्त्वाकांक्षी दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना केंद्र सरकारने सुरू केली. मात्र ही कामे संथगतीने राबविली जात आहे. कालबद्ध वेळेत काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदारांवर कारवाई करू, असा इशारा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिला.

Complete the work of Gramjyoti Yojna promptly | ग्रामज्योती योजनेची कामे तातडीने पूर्ण करा

ग्रामज्योती योजनेची कामे तातडीने पूर्ण करा

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्रामीण भागातील प्रत्येकांच्या घरात विजेची सोय व्हावी, यासाठी महत्त्वाकांक्षी दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना केंद्र सरकारने सुरू केली. मात्र ही कामे संथगतीने राबविली जात आहे. कालबद्ध वेळेत काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदारांवर कारवाई करू, असा इशारा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिला. स्थानिक शासकीय विश्रामगृहात बुधवारी विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते.
यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अधीक्षक अभियंता मस्के, अधीक्षक अभियंता (पायाभूत सुविधा) घोगरे, कार्यकारी अभियंता कुरेकार, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, राजू घरोटे, जि.प. सदस्य सुनिल उरकुडे, नरेंद्र जिवतोडे आदी उपस्थित होते. ना. अहीर म्हणाले, शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य वेळेत करून घेण्याची जबाबदारी वरिष्ठांवर असताना अधिकारी विकासात्मक कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ही कामे निर्धारीत कालावधीत होत नसल्याचे निदर्शनास येते. लोकांकडून तक्रारी केल्यानंतरही दखल घेतली जात नाहीे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विकासकामे करावीत. अधिनस्त अधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा. कामे वेळेवर होत नसतील तर यासाठी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाºयांना दिली. मुख्य अभियंता भादीकर यांनी दीनदयाल उपाध्याय योजनेच्या अंमलबजावणीची माहिती सादर केली. विहित कालावधीत कामे पूर्ण करण्याचे आश्वासन या बैठकीत दिले.
बेरोजगार अभियंत्यांची दखल
बेरोजगार वीज अभियंत्यांची नोंदणी करण्याच्या सूचना ना. अहीर यांनी दिल्या. बेरोजगार वीज अभियंत्यांच्या प्रश्नांची दखल घेतली. त्यांना रोजगार उपलब्ध करण्याच्या गरजेवर या बैठकीत भर देण्यात आला. वीज वितरण कंपनीने अभियंत्यांची नोंदणी करावी. नोंदणीकृत बेरोजगार कामे उपलब्ध करू द्यावे, असेही ना. अहीर यांनी बैठकीत सांगितले.
वीज खांबांची समस्या सुटणार
काही तालुक्यांचा महसुली विस्तार लक्षात घेता त्याठिकाणी स्वतंत्ररित्या वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय स्थापन करणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात मागणी करणारा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची सूचना ना. अहीर यांनी दिली. दरम्यान नागरिकांची गरज लक्षात घेवून तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीकरिता लवकरच सादर केले जाईल, असे आश्वासन मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांनी दिले. बाबुपेठ उड्डाण पुलासाठी विजेचे खांब २० दिवसांत स्थानांतरीत केले जाणार आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

Web Title: Complete the work of Gramjyoti Yojna promptly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.