जन-वन विकास योजनेतून ताडोबात २९ कोटींची कामे पूर्ण

By admin | Published: September 20, 2016 12:40 AM2016-09-20T00:40:34+5:302016-09-20T00:40:34+5:30

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना ताडोबाच्या बफर क्षेत्रातील गावांसाठी विकासाला चालना देणारी ठरली आहे.

Complete work of Tadoba works worth Rs. 29 crores under Jan-Van Vikas Yojana | जन-वन विकास योजनेतून ताडोबात २९ कोटींची कामे पूर्ण

जन-वन विकास योजनेतून ताडोबात २९ कोटींची कामे पूर्ण

Next

३८ हजार ४७४ कामे पूर्ण : ताडोबाचे बफर क्षेत्र विकासाकडे
चंद्रपूर : डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना ताडोबाच्या बफर क्षेत्रातील गावांसाठी विकासाला चालना देणारी ठरली आहे. या योजनेसह वन विभागाच्या विविध योजनेंतर्गत या गावांमध्ये तब्बल ३८ हजार ४७४ कामे करण्यात आली आहेत. यावर २९ कोटी सात लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातून पायाभूत विकासासह अत्यावश्यक गरजांची अनेक कामे पूर्ण झाल्याने ही योजना गावकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरली आहे.
वन विभागाच्यावतीने ताडोबा बफर क्षेत्राच्या विकासाठी विविध प्रकारच्या योजना, उपक्रम राबविले जात आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने या योजना राबविल्या जातात. विभागाच्या विविध योजनांसह नव्याने सुरू झालेल्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेंतर्गतही अनेक कामे हाती घेण्यात आली आहे. त्यातून बफर क्षेत्रात सध्या विकासाची हजारो कामे होत आहेत.
गावांच्या गरजा लक्षात घेता कामे हाती घेण्यात येत असल्याने बफरमधील गावे स्वयंपूर्णतेकडे जात आहे. ७२ प्रकारची विविध कामे या क्षेत्रात घेतली जात आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये ई-लर्निंग सुविधेची १०१ कामे, सहा हजार ५६४ पाणी फिल्टर यंत्रांचा पुरवठा, ४२९ दुधाळू जनावरांचे वाटप, १९ हजार ६१९ एलपीजी गॅसचा पुरवठा, दोन हजार २६६ शौचालयांचे बांधकाम, ४३६ विहीरींच्या कठड्यांचे बांधकाम अशा मुलभूत बाबींचा समावेश आहे.
आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांमध्ये जन-वन योजनेतून १९ हजार ४७७ तर इतर योजनेतून १८ हजार ९९७ अशा एकूण ३८ हजार ४७४ कामांचा समावेश आहे. ताडोबाच्या बफर जंगलासह वाघ व अन्य प्राण्यांचे रक्षण करून ताडोबाला आंतरराष्ट्रीय दजार्चा व्याघ्र प्रकल्प म्हणून विकसित करण्यासाठी बझर क्षेत्रातील गावांचा मोठा हातभार लागला आहे. त्यामुळे ही गावे विकासाच्या बाबतीत मागे राहू नये म्हणून जन-वन विकास योजना राबविली जात आहे.
जन-वन व विभागाच्या इतर योजनेतून बफर क्षेत्रातील या गावांवर २९ कोटी सात लाख रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

विविध कामे पूर्णत्वास
चार हजार ८८ गॅस ओट्यांचे बांधकाम, एक हजार ९८३ दगडी बंधारे, आठ मृद संधारणाची कामे, १९ सिमेंट बंधारे, १४२ तलावांचे खोलीकरण, ३६ बोअरवेल, पाच विहीरींचे बांधकाम, ३९ सोलर पंप, सात अगरबत्ती प्रकल्प, तीन चरखा उद्योग, २४ गाई गोठ्यांचे बांधकाम, ४६ स्मार्ट अंगणवाडी, ८५ हेक्टरवर दोन रोपवनांची निर्मीती, ४५० सोलर लाईट, ६९० सोलर कुंपन, १५ बांबू प्रकल्प प्रशिक्षण, ३६ पर्यटन जिप्सीसाठी अर्थसहाय्य यासह बोटींग प्रकल्प, जोडधंद्यासाठी मत्स्यव्यवसाय, दुधप्रकल्प, कुक्कुटपालन अशा कामांचा समावेश.

Web Title: Complete work of Tadoba works worth Rs. 29 crores under Jan-Van Vikas Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.