नांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्णत्त्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:29 AM2021-07-30T04:29:37+5:302021-07-30T04:29:37+5:30

परिसरातील नांदा, बिबी, आवारपूर, नोकरी, पालगाव, लालगुडा आदी गावांना या रुग्णालयाचा मोठा फायदा होणार आहे. गावाची वस्ती मोठ्या प्रमाणात ...

Completion of Nanda Primary Health Center | नांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्णत्त्वास

नांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्णत्त्वास

googlenewsNext

परिसरातील नांदा, बिबी, आवारपूर, नोकरी, पालगाव, लालगुडा आदी गावांना या रुग्णालयाचा मोठा फायदा होणार आहे. गावाची वस्ती मोठ्या प्रमाणात असून, लोकांनासुद्धा उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, नारांडा येथे सात ते आठ किलोमीटर अंतर कापून जावे लागते. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपलब्धतेमुळे रुग्णांसाठी गावातच सेवा उपलब्ध करून देता येईल. सध्या खासगी रुग्णालयातून गावातील नागरिक उपचार घेत असून, यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यास रुग्णांचा वेळ व खर्चात मोठी बचत होईल. तेव्हा लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत. तब्बल ९ कोटी रुपये खर्च करून रुग्णालयाची इमारत उभी करण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मंजुरीबाबतही प्रसिद्धी करण्यात आली आहे. परंतु अद्याप प्रत्यक्षात जागा न भरल्याने रुग्णालय कधी सुरू होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Completion of Nanda Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.