शाळा महाविद्यालय बंदला संमिश्र प्रतिसाद

By Admin | Published: July 28, 2016 01:32 AM2016-07-28T01:32:19+5:302016-07-28T01:32:19+5:30

ओबीसीच्या विविध मागण्यासाठी बुधवारी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून

Composite response to the school college closed | शाळा महाविद्यालय बंदला संमिश्र प्रतिसाद

शाळा महाविद्यालय बंदला संमिश्र प्रतिसाद

googlenewsNext

चंद्रपूर : ओबीसीच्या विविध मागण्यासाठी बुधवारी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर शाळा महाविद्यालय बंद पुकारण्यात आले होते. या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी शाळा व महाविद्यालये बंद तर काही ठिकाणी सुरु होते. सदर आंदोलनाला ओबीसी संघटना, ओबीसी विद्यार्थी संघटनानीही पाठिंबा दिला होता. या शिष्टमंडळात अध्यक्ष जगदीश जुनगरी, संघटक दिवाकर गमे, अ‍ॅड बाबूराव बेलसरे, प्रतिमा वासाडे आदी उपस्थित होते.
ओबीसी कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ओबीसीच्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी ओबिसी कृती समितीचे संयोजक सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फंत मुख्यमंत्री, राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ओबीसी कृती समितीचे विदर्भ संघटक बबनराव वानखेडे, राम कुंभारे, संजय गावंडे आदी उपस्थित होते.

या आहेत मागण्या
केंद्र शासनाने ओबीसी जनगणना जाहीर करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा साडेचार लाखावरुन सहा लाख करण्यात यावी. एस.सी, एसी.टी, संवर्गातील विद्यार्थ्याप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणात ५० टक्के ऐवजी शंभर टक्के शिष्यवृत्ती आणि शुल्क परतावा त्याचा शैक्षणिक सत्रात देण्यात यावा, केंद्रिय विद्यापीठाप्रमाणे ओबीसीसाठी असलेले २७ टक्के आरक्षण शिक्षण आणि नोकरीत देण्यात यावे, केंद्रिय विद्यापीठ व संस्थामधुन युजीसी व मानव संसाधन मंत्रालयाने ओबीसी प्रवर्गातील प्रोफेसर व असोसिएट प्रोफेसर पदाचे रद्द केलेले आरक्षण पुर्ववत करण्यात यावे, एस.टी.प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएचडिसाठी देण्यात येणारी राजीव गांधी नॅशनल फेलोशिप सुरु करावी.

Web Title: Composite response to the school college closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.