कंपाऊंडरच सांभाळतो चिकित्सालयाचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 05:00 AM2020-07-27T05:00:00+5:302020-07-27T05:01:00+5:30

तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयीचे व्हावे, जनावरांना वेळीच व योग्य उपचार मिळावे यासाठी लाखो रुपये खर्च करून सर्व सोयीयुक्त पशुवैद्यकीय चिकित्सालय बांधण्यात आले. त्यावेळी कार्यरत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी संदिप छोंकर व सचिन हगवणे यांच्या जोडीने चिकित्सालयाला नविन रूप दिले. येथे अनेक जनावरांवर शस्रक्रिया देखील करण्यात आल्या.

The compounder manages the hospital | कंपाऊंडरच सांभाळतो चिकित्सालयाचा कारभार

कंपाऊंडरच सांभाळतो चिकित्सालयाचा कारभार

Next
ठळक मुद्देपशुपालकांचे हाल : पशु लघु वैद्यकीय चिकित्यालय वाऱ्यावर

राजू गेडाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : गुरांवर उपचार करता यावा यासाठी मूल येथे लाखो रुपये खर्च करून अद्यावत लघुपशु वैद्यकीय चिकित्सालय बांधण्यात आले. काही दिवस येथील कारभार सुरळीत चालल्यानंतर आता मात्र चिकित्सालयामध्ये योग्य उपचार मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकरून केली जात आहे. येथे कार्यरत असलेले कंपाऊंडरच चिकित्सालयाचा डोलारा सांभाळत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयीचे व्हावे, जनावरांना वेळीच व योग्य उपचार मिळावे यासाठी लाखो रुपये खर्च करून सर्व सोयीयुक्त पशुवैद्यकीय चिकित्सालय बांधण्यात आले. त्यावेळी कार्यरत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी संदिप छोंकर व सचिन हगवणे यांच्या जोडीने चिकित्सालयाला नविन रूप दिले. येथे अनेक जनावरांवर शस्रक्रिया देखील करण्यात आल्या. अद्यावत साधनसामुग्री व औषधांचा साठा बघता जनावरांवर तत्काळ उपचार केला जात होता. यामुळे सदर पशुवैद्यकीय चिकित्सालय नावारुपास आले. त्यानंतर मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अद्यावत साधनसामुग्रीचे पशुवैद्यकीय चिकित्सालय तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी वाऱ्यावर पडले आहे. येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रभार डॉ. वरठी यांच्याकडे आहे. मात्र त्यांच्याकडे इतर गावांचाही प्रभार असल्याने ते वेळ देण्यास असमर्थ ठरत आहे.
मूल तालुक्यातील चिचाळा येथील पशुपालक प्रविण बोबाटे यांच्याकडे दुधाळ जनावरे असून त्यांच्या गाईचे वासरू अचानक बिमार पडले. त्याला तालुक्यातील पशुवैद्यकिय दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु येथील डॉक्टर रूग्णालयात हजर नसल्याचे लक्षात आले. रूग्णालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडून डॉक्टर अनुपस्थित असल्याचे कारण विचारण्यात आले. पशुवैद्यकिय अधिकारी हे चंद्रपूरात असल्याचे सांगण्यात आले. तालुक्याच्या ठिकाणी असलेले प्रशस्त रूग्णालय पशुपालकांच्या सेवार्थ नसून अनेक पशुपालकांना खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेण्याची वेळ येत आहे. त्यामुळे येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

मूल तसेच चंद्रपूर येथील पशु वैद्यकिय चिकित्सालयाचा प्रभार असून दोन्ही ठिकाणी मला सेवा द्यावी लागत आहे. वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशानुसारच मी दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे.
- डॉ. हरीराम वरठी,
तालुका लघू पशू वैद्यकीय चिकित्सक,पशुवैद्यकीय चिकित्सालय, मूल

Web Title: The compounder manages the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.