भद्रावतीत श्री मंगल कार्यालय येथे शंभर खाटांचे कोविड सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:28 AM2021-04-21T04:28:49+5:302021-04-21T04:28:49+5:30

फोटो भद्रावती : शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. तालुक्यात ७६४ ॲक्टिव्ह रुग्ण ...

Comvid center of one hundred beds started at Shri Mangal office in Bhadravati | भद्रावतीत श्री मंगल कार्यालय येथे शंभर खाटांचे कोविड सेंटर सुरू

भद्रावतीत श्री मंगल कार्यालय येथे शंभर खाटांचे कोविड सेंटर सुरू

Next

फोटो

भद्रावती : शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. तालुक्यात ७६४ ॲक्टिव्ह रुग्ण असून ग्रामीण भागात १३३ व शहरी भागात ६३१ रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर येथील श्री मंगल कार्यालयमध्ये १०० खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरचे उद्घाटन मंगळवारी खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते पार पडले.

याप्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार महेश शितोळे, डॉक्टर विवेक शिंदे, चंद्रपूर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे, डॉक्टर मंगेश आरेवर, न. प. मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर,वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष सिंग, ठाणेदार सुनील सिंह पवार, डॉ. संजय असूटकर ,डॉ. नितीन सातभाई, डॉ. विनय कुंभारे उपस्थित होते.

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रवींद्र शिंदे यांनी स्वतःचे मंगल कार्यालय कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिले. तसेच रुग्णांची जेवण व नाश्त्याची सोयसुद्धा त्यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. भद्रावती न.प.चे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी तत्काळ शंभर खाटा, चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन व अन्य सुविधांची व्यवस्था करून दिली. ग्रामीण रुग्णालयातर्फे डॉ. मनीष सिंग यांनी संपूर्ण स्टाफसह औषधोपचाराची व्यवस्था करून दिली. अवघ्या एक ते दोन दिवसांत तत्काळ निर्णय घेऊन हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले.

आपल्याला चंद्रपूर जिल्हा कोरोनामुक्त करायचा आहे. त्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करावे. ऑक्सिजन उपलब्धतेबाबत आम्ही सर्व परीने प्रयत्न करू. तसेच निधीबाबतही चर्चा सुरू असून याच दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांसोबत आजच आढावा बैठक आहे, असे याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर म्हणाले.

Web Title: Comvid center of one hundred beds started at Shri Mangal office in Bhadravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.