मराठी चित्रपटांच्या यशाबाबत चिंताच !

By admin | Published: April 27, 2016 01:01 AM2016-04-27T01:01:16+5:302016-04-27T01:01:16+5:30

मराठीत चांगले आशयदान चित्रपट निघत आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळत आहेत.

Concern about the success of Marathi films! | मराठी चित्रपटांच्या यशाबाबत चिंताच !

मराठी चित्रपटांच्या यशाबाबत चिंताच !

Next

अरुण नलावडे : मुलाखतीत व्यक्त केली मराठी चित्रपटांची व्यथा
वसंत खेडेकर बल्लारपूर
मराठीत चांगले आशयदान चित्रपट निघत आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळत आहेत. आॅस्करपर्यंत त्यांनी धडक मारली आहे. हे सारे कौतुकास्पद आणि मराठी माणसांची छाती फुलावी, असे असले तरी त्यातील किती चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचतात आणि ते थिएटरात लागले तरी कितीजण बघतात हा चिंतेचा विषय आहे. आशयघनासोबत मराठी चित्रपटांची संख्याही वाढली. पण त्यांना आर्थिक यश मिळत नसेल. प्रेक्षकांपर्यंत ते पोहचत नसेल तर काय उपयोग, असा विचार लावणारा प्रश्न प्रसिद्ध निर्माता, निर्देशक आणि नट अरुण नलावडे यांचा आहे.
अरुण नलावडे यांच्या दिग्दर्शनात ‘ताटवा’ हा चित्रपट बनत आहे. त्यात त्यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे तब्बल २० दिवस चालले. नलावडे यांचा या दरम्यान नवरगावलाच मुक्काम होता. ‘लोकमत’ने तेथे त्यांची मुलाखत घेतली. त्याप्रसंगी त्यांनी मराठी चित्रपटांबाबत वरील शब्दात चिंता व्यक्त केली. आपले भाषेवर प्रेम करण्याकरिता मराठी माणूस बराच मागे आहे. दक्षिण भारतात याहून वेगळे चित्र आहे. तेथील प्रेक्षक आपल्या मातृभाषेतील चित्रपट उचलून धरतात. त्यामुळे, तिकडील निर्माता व दिग्दर्शकांना आपला चित्रपट चालणारच अशी हमी असते. या विश्वासानेच ते चित्रपटांवर मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवितात. मराठीत तशी शाश्वती नाही.चित्रपट चालणार का, त्याला थिएटर मिळणार का, ही चिंता मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांना लागलेली असते, असे सांगत नलावडे यांनी निर्माण केलेल्या व त्यात त्यांची आजोबाची भूमिका असलेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘श्वास’ ला पडद्यावर झळकविण्याकरिता कसे कष्ट घ्यावे लागले, याबाबत सांगितले. ‘श्वास’ हा वेगळ्या विषयाचा चित्रपट तयार झाला. पण त्याला कुणीच वितरक मिळेना. हा काय चित्रपट आहे? असे म्हणत तो घ्यायला सारेच नकार देऊ लागले. शेवटी आम्ही प्रोजेक्टरची व्यवस्था करुन गावोगावी फिरुन लोकांना वेगवेगळ्या क्तृप्त्यांनी जमवून त्यांना हा चित्रपट मोफत दाखवू लागलो. लोकांना तो आवडला. तोंडातोंडी त्याची प्रसिद्धी झाली. मग, थिएटरवाले त्याला थिएटरात लावायला तयार झाले. पुढे काय झाले हे आपण सारेजण जाणतातच! नलावडे हे मूळचे कोकणचे! सध्या एका मालिकेतून कोकणातील लोकांचा भूत पिशाच्यावर भयंकर विश्वास आह,े असे दाखविले जात आहे. यावर बोलताना ते म्हणाले, कोकणात ग्रामीण भागात तशी स्थिती आहे. पण, आता जागरुकता येऊन चित्र बदलत चालले आहे. नलावडे यांचे ४० वर्षापूर्वी रंगभूमीवर डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत पदार्पण झाले होते. अग्निपंथ या नाटकातील त्यांची भूमिका गाजली. श्वास हा त्यांचा पहिला चित्रपट, विदर्भात तयार झालेल्या ‘तानी’ या चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका केली होती. का रे दुरावा या मालिकेतील त्यांचा केतकर काका प्रेक्षकांना खूप आवडला. नागपूरचे प्रसिद्ध समजासेवी, विमल आश्रमात वेश्यांच्या मुलांना संस्कारित करीत असलेल्या रामभाऊ इंगोले यांच्या कार्यावर ‘वारसा‘ हा चित्रपट ते बनवित आहेत. त्यात ते रामभाऊचे पात्र करीत आहेत. संपूर्ण चित्रीकरण नागपुरातच होणार आहे. हे ऐकून आपले विदर्भावर बरेच प्रेम दिसते, असे विचारता ‘हो’ असे हसत म्हणाले. आपणाला कोणत्याही प्रकारची भूमिका करणे आवडते. खलनायकसुद्धा. असे सांगत कलाकाराने चौकटीत बंदिस्त राहू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Concern about the success of Marathi films!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.