पुस्तक विक्रेत्यांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:53+5:302021-06-01T04:21:53+5:30
लहान व्यावसायिक ग्राहकांच्या सेवेत चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये ग्राहक लहान व्यावसायिकांकडून जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहे. विशेष ...
लहान व्यावसायिक ग्राहकांच्या सेवेत
चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये ग्राहक लहान व्यावसायिकांकडून जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहे. विशेष म्हणजे, अन्य वेळी मोठमोठ्या दुकानातून खरेदी करणारे ग्राहकही आता छोट्या व्यावसायिकांना महत्त्व देत असल्याचे चित्र चंद्रपूर शहरात बघायला मिळत आहे.
नदीपात्रात नागरिकांची गर्दी
चंद्रपूर : काही अतिशौकीन नागरिक इरई नदीच्या पात्रामध्ये पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जात आहे. या नागरिकांवर प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, लहान बालकांनाही काही जण घेऊन जात असल्याचा प्रकार येथे बघायला मिळत आहे.
खावटी कर्जाचे वितरण करण्याची मागणी
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांना कर्ज योजना सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. कोरोनामुळे लागणाऱ्या अत्यावश्यक गरजाही ते पूर्ण करण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे आदिवासी भागातील नागरिकांसाठी खावटी कर्ज वितरित करून या बांधवांनी दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.