६१ टक्के नमुन्यांचा निष्कर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:27 AM2021-04-17T04:27:40+5:302021-04-17T04:27:40+5:30
६१ टक्के नमुन्यांचा निष्कर्ष प्रत्येक जिल्ह्यातून एकून पॉझिटिव्ह रुग्णांच्या पाच टक्के तपासणीसाठी दर आठवड्याला पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ...
६१ टक्के नमुन्यांचा निष्कर्ष प्रत्येक जिल्ह्यातून एकून पॉझिटिव्ह रुग्णांच्या पाच टक्के तपासणीसाठी दर आठवड्याला पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी एनआयव्हीला पाठविण्याच्या सूचना आयसीएमआरच्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातूनही ५ टक्के पाठविले जात आहेत. जानेवारी ते मार्चदरम्यान राज्यातून घेतलेल्या नमुन्यांचा निष्कर्ष जाहीर झाला. ३६१ नमुन्यांपैकी ६१ टक्के म्हणजे २२० नमुन्यात डबल म्युटेशन झाल्याचे आढळले आहे.
कोट
चंद्रपूर जिल्ह्यातून दर आठवड्याला एकून पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत ५ टक्के नमुने पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविणे सुरू आहे. या नमुन्यांचा निष्कर्ष जिल्हानिहाय कळविला जात नाही. केवळ आयसीएमआरकडे पाठविला जातो. त्यामुळे डबल म्युटेशनबाबत अधिकृत निष्कर्ष सांगता येणार नाही. मात्र, रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने अशी शक्यताही नाकारता येत नाही.
- डॉ. प्रकाश साठे, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर