कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:19 AM2021-07-04T04:19:49+5:302021-07-04T04:19:49+5:30
शंकरपूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून येथील मंडळ कृषी कार्यालयांतर्गत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप करण्यात आला. सात दिवस ...
शंकरपूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून येथील मंडळ कृषी कार्यालयांतर्गत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप करण्यात आला. सात दिवस चाललेल्या या मोहिमेत सोयाबीन, कापूस, भात, तूर पिकाचे लागवड तंत्रज्ञानबाबत व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. चिचाळा कुणबी येथे मे व जून महिन्यात बीबीएफ यंत्राच्या साह्याने प्रत्यक्ष पेरणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रशांत चौधरी यांच्या शेतावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमात आंबोली, जवराबोडी, साठगाव, कोलारी, शंकरपूर येथील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मनीषा ढोरे, प्रगतिशील शेतकरी प्रशांत चौधरी, तर मार्गदर्शक म्हणून तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक किनाके, मंडळ कृषी अधिकारी संपदा इंगुळकर, कृषी पर्यवेक्षक भास्कर फरकाडे, कृषी सहायक प्रियंका नंद, प्रमोद भगत, रावसाहेब नवले, योगेश रघुते, संदीप कांबळे उपस्थित होते.