रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल, बाहेर नातेवाईक बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:26 AM2021-04-13T04:26:52+5:302021-04-13T04:26:52+5:30
बॉक्स नातेवाइकांना जाता येत नाही अन् दुकानात काही मिळत नाही रुग्ण ॲडमिट असेल तर त्याचे नातेवाईक केंद्राच्या बाहेर असतात. ...
बॉक्स
नातेवाइकांना जाता येत नाही अन् दुकानात काही मिळत नाही
रुग्ण ॲडमिट असेल तर त्याचे नातेवाईक केंद्राच्या बाहेर असतात. रुग्णांना काही गरज भासेल म्हणून ते तिथेच थांबतात. परंतु, त्यांची मोठी अडचण जात असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांच्या काळजीपोटी ना ते घरी जाऊ शकत तर ब्रेक द चेनमुळे त्यांना कोणतेही साहित्य मिळू शकत नाही. त्यामुळे रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाइकांचे मोठे हाल होत आहेत.
कोट
माझा मोठा भाऊ रुग्णालयात आहे. त्याची तब्येत कशी आहे, हे सांगणारे इथे कुणीच नाही. त्याला जेवन वेळेवर मिळते की नाही, हेसुद्धा कळत नाही. त्यामुळे व्हिडिओक्लालद्वारे रुग्णांला दाखविण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी.
- रुग्णाचा भाऊ
-------
तीन दिवसांपासून माझे वडील भरती आहेत. भेटायला जातो. म्हटले तर अनेक अटी व शर्ती लादल्या आहेत. नातेवाइकांसाठी कुठलीच व्यवस्था करण्यात आली नाही. साधे थंड पाण्याची व्यवस्था नसल्याने अडचण जाते.
- रुग्णाचा मुलगा
------
आमची कोणतीही व्यवस्था केली नाही तरी चालेल. परंतु, उपचार घेत असलेल्या रुग्णांवर काळजीपूर्वक उपचार करावा. आम्ही लसीकरणासाठी गेलो होतो, तर आमचे लसीकरणसुद्धा करण्यात आले नाही. शासन म्हणते लसीकरण करा आणि डॉक्टर म्हणतात लस संपली.
-रुग्णाची आई