त्या रस्त्याची दुरवस्था कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:53+5:302021-06-17T04:19:53+5:30

सिंदेवाही : शहरातील पोलीस स्टेशन जवळ असलेल्या परिसरात रस्ता पहिल्याच पावसाळ्यातील पाण्याने चिखलमय झालेला आहे. शहरातील नागरिकांना ...

The condition of that road is forever | त्या रस्त्याची दुरवस्था कायमच

त्या रस्त्याची दुरवस्था कायमच

Next

सिंदेवाही : शहरातील पोलीस स्टेशन जवळ असलेल्या परिसरात रस्ता पहिल्याच पावसाळ्यातील पाण्याने चिखलमय झालेला आहे.

शहरातील नागरिकांना चिखलातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरात जाणारी मुख्य रस्त्याची वाहतूक, आजूबाजूच्या परिसरात शासकीय रुग्णालय, पोलीस स्टेशन, लहान मुलांचे खासगी रुग्णालय, मेडिकल, खासगी शाळा, महाविद्यालय, डोळ्यांचा दवाखाना, आरोग्य विभागीय कार्यालय, विद्युत महामंडळ, ग्रामपंचायत कार्यालय, बुद्ध विहार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांना जाण्याकरिता चिखलातून मार्गाचा त्रासदायक सामना करावा लागत आहे. शहरातील वाहतूक या रस्त्याने वर्दळीची असून लोनवाही आणि सिंदेवाही या दोन शहरांना जोडणारा अंतर्गत रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले आहे. ग्रामपंचायत द्वारे चिखलमय रस्ता नेहमीच मुरूम व मातीचा थर टाकून तात्पुरती डागडुजी केली जाते. मातीचा वापर रस्त्यावर केल्याने चिखल झाले आहे. शहरातील मुख्य रास्ता असल्याने दुचाकी, चार चाकी वाहने, रुग्णवाहिका, वर्दळीची वाहतूक वाढलेली आहे. संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.

कोट

माझे लहान मुलांचे खासगी रुग्णालय आहे. नेहमीच चिखलमय रस्ता आणि धुळीमुळे आरोग्याचे दृष्टिकोनातून हा प्रकार त्रासदायक ठरत आहे.

- डॉ. विनय बंडावार, सिंदेवाही ( बालरोग तज्ज्ञ).

===Photopath===

160621\img_20210615_130934.jpg

===Caption===

त्या रस्त्याची दुरावस्था कायमच ! पहिले पावसाने चिखलमय रस्ता

Web Title: The condition of that road is forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.