दंडात्मक रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनीवर जप्तीची कारवाई.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:33 AM2021-02-17T04:33:55+5:302021-02-17T04:33:55+5:30
कोरपना तहसीलदारांची धडक मोहीम कोरपना : तालुक्यातील पारडी येथील बालाजी बिल्डर ॲन्ड डेव्हलपरतर्फे विश्वजित सावजी याच्या किरायाने असलेल्या सर्व्हे ...
कोरपना तहसीलदारांची धडक मोहीम
कोरपना : तालुक्यातील पारडी येथील बालाजी बिल्डर ॲन्ड डेव्हलपरतर्फे विश्वजित सावजी याच्या किरायाने असलेल्या सर्व्हे नंबर ५१/२ मधील २.२७ हे.आर. क्षेत्रात प्लान्ट विना मंजुरीने चालत होता. त्याच्या अकृषक वापरावर २५ जून २०२० ला दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र बरेचदा शासनाने निर्देश देऊनही दंडात्मक रक्कम भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने तहसीलदार कोरपना यांनी वसुलीसाठी जप्तीची कारवाई मंगळवारी केली.
यानुसार जंगम मालमत्ता अटकवून ठेवण्याचे अधिकार पत्र मंडळ अधिकारी व तलाठी पारडी यांना देऊन कंपनीचे ट्रॅक्टर, काँक्रिट मिक्सर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. ही कारवाई तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, तलाठी वीरेंद्र मडावी, प्रकाश कमलवार, सहकर्मचारी संजय कुळमेथे व बाळू परचाके यांनी केली.