ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार यादीत घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:27 AM2020-12-29T04:27:42+5:302020-12-29T04:27:42+5:30

त्यात ज्या मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहे, त्यात कुठलेही कारण नसताना मतदारांना एका वार्डा मधुन दुसर्‍या वार्डात मतदारांचे ...

Confusion in the voter list in the Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार यादीत घोळ

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार यादीत घोळ

googlenewsNext

त्यात ज्या मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहे, त्यात कुठलेही कारण नसताना मतदारांना एका वार्डा मधुन दुसर्‍या वार्डात मतदारांचे नाव व यादी स्थलांतरीत करून घोळ के्ल्याचा आरोप समता सैनिक दलाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

डाॅ. आंबेडकर वार्ड ४ या एकाच वार्डातून १७० नावे वार्ड ३ मधे वळविण्यात आले. त्यात एकाच कुटुंबातील काही सदस्य वार्ड ३ तर काही वार्ड ४ मध्ये वळवण्यात आले. वार्ड दोनमध्ये अनुसुचित जाती सर्वसाधारण उमेदवारचा पत्ता कट झाल्याने या वार्डातील काही माजी सदस्यांनी वार्डातील हेतू परस्पर तीनशे नावे वार्ड एकच्या मतदार यादीमध्ये स्थानांतरित केले आहे. एका घरामध्ये दोन वार्डातील मतदार राहणार आहे. अशीच परिस्तिथी सर्वच वार्डात बघायला मिळत आहे. मतदार यादी जाहीर केल्यानंतर कुठल्याही प्रकारची माहिती जनतेला देण्यात आली नाही. ही तफावत लक्षात घेता लाॅकडाऊनच्या आधी घोषित केलेले माजरीतील प्रत्येक वार्डाचे जातीनिहाय आरक्षण व सद्या फेरबदल करुन घोषित केलेल्या याद्यांमधे जातीनिहाय बरीच तफावत आढळत आहे. हा फेरबदल कुणाला फायदा पोहचविण्यासाठी करण्यात आलेला, असा प्रश्न समता सैनिक दलाने जिल्हाधिकारी तहसीलदार भद्रावती तसेच ग्रा.पं. माजरीचे सचिवांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. निवेदन देताना समता सेनिक दल शाोचे मार्शल हर्षल रामटेके, सुनिल झरिया, रुपेश ढोके, निलेश भेले, प्रणय चिवंडे, रितेश चिकाटे, कमलाकर काटकर, रंजित वासनिक,रतन पाटील उपस्थित होते.

Web Title: Confusion in the voter list in the Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.