काँग्रेसकडून कर्नाटकातील लोकशाही विजयाचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:22 PM2018-05-19T23:22:01+5:302018-05-19T23:22:12+5:30

काँग्रेसच्या वतीने कर्नाटक राज्यातील राजकीय घडामोडीचा लोकशाही विजय म्हणून चंद्रपूर व बल्लारपुरात जल्लोष करण्यात आला. काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळयाजवळ तर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात महानगरपालिका चौकात फटाक्याची आतिषबाजी करुन जल्लोष करण्यात आला.

Congratulating Democracy in Karnataka | काँग्रेसकडून कर्नाटकातील लोकशाही विजयाचा जल्लोष

काँग्रेसकडून कर्नाटकातील लोकशाही विजयाचा जल्लोष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : काँग्रेसच्या वतीने कर्नाटक राज्यातील राजकीय घडामोडीचा लोकशाही विजय म्हणून चंद्रपूर व बल्लारपुरात जल्लोष करण्यात आला. काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळयाजवळ तर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात महानगरपालिका चौकात फटाक्याची आतिषबाजी करुन जल्लोष करण्यात आला. बल्लारपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद साजरा केला.
कर्नाटक राज्यात अलिकडे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला सरकार स्थापन करण्याईतपत स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तरीही राज्यपालांनी राजकीय दबावाखाली काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाच्या युतीकडे स्पष्ट बहुमत असताना भाजपाला सरकार बनविण्याची संधी दिली. परिणामी दाद मागण्यासाठी काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठवावे, लागले. सर्वोच न्यायालयाने शनिवारी भाजपाला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले. यामध्ये बहुमत सिद्ध न करता आल्याने मुख्यमंत्री यद्दीयुरप्पा यांना राजकीय घडामोडीत राजीनामा सादर करावा लागला. हा विजय म्हणजे लोकशाहीचा विजय आहे. असे म्हणून काँग्रेसनी जल्लोष साजरा केला. गांधी चौकातील कार्यक्रमात युवा नेते राहुल पुगलिया, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, मनपा गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, अ‍ॅड. अविनाश ठावरी, अशोक नागापूरे, नगरसेवक कुशल पुगलिया, देवेंद्र बेले, चंद्रशेखर पोडे, प्रविण पडवेकर आदी उपस्थित होते. तर नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या कार्यक्रमात मोहन डोंगरे, घनश्याम वासेकर, निखील धनवलकर, दीपक कटकोजवार, शालिनी भगत, वंदना भागवत, वकार काजी आदी उपस्थित होते. तर बल्लारपूर येथील कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदांनी दिलीप माकोडे, माजी उपाध्यक्ष पवन भगत, देवेंद्र आर्य, अब्दूल करीम, नाना बुंदेल, इस्माईल डाकवाला, नगरसेवक भास्कर माकोडे, अमीत पाझारे, सचिन जाधव, प्राणेश अमराज, ओमप्रकाश कुशवाह, विलास आमटे, सतीश तोटा, यांच्यासह काँग्रेस पदाधिकाºयांची उपस्थिती होते.

Web Title: Congratulating Democracy in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.