धनगर समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:44 PM2018-08-31T22:44:43+5:302018-08-31T22:45:25+5:30
महाराष्ट्र धनगर समाज महासंघ (प्रणित) मल्हारसेना व अहिल्या महिला संघ जिल्हा चंद्रपूर या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र धनगर समाज महासंघ (प्रणित) मल्हारसेना व अहिल्या महिला संघ जिल्हा चंद्रपूर या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गडचिरोलीमध्ये महापूर आला. त्यात खंदला राजाराम, ता. अहेरी, येथील अनेक मेंढपाळांच्या मेंढ्या वाहून गेल्या. अहेरीचे तहसीलदार यांनी पंचनामा करुन पूरग्रस्थांचा अहवाल जिल्हाधिकारी गडचिरोली यांना पाठविला असून त्यात बिरा पैका मुर्कीवार यांच्या ३१९ मेंढ्या व भिमा पैका बोर्लावार यांच्या ३०२ मेंढ्या वाहून गेल्याचे नमूद आहे. या दोन्ही मेंढपाळाकडे मेंढ्या चराऊ पासेस उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांनाच पूरग्रस्थांच्या अहवालात स्थान दिले आहे. ज्या मेंढपाळांकडे मेंढ्या चराऊ पासेस नाही, अशा मेंढपाळाचा पूरग्रस्थांच्या अहवालात समावेश नाही. यात श्रीकांत राजू येगेवार यांच्या ४८ मेंढ्या, प्रकाश बिरा येगेवार यांच्या ५१ मेंढ्या, कल्पना रमेश मंडलवार, नांदगाव यांच्या ३९ मेंढ्या, लचमा बिरा अन्नावार यांच्या ४१ मेंढ्या, किसन पोचू कंकलवार यांच्या ३५ मेंढ्या, मल्ला लिंग डंकरवार यांच्या ४२ मेंढ्या, मार्कंडी मिटपल्लीवार रा. कुदरसी टोला यांच्या ४२ मेंढ्या, नितेश भिमा बोर्लावार यांच्या ४६ मेंढ्या, पैका भिमा बोर्लावार यांच्या ३८ मेंढ्या, जयेश भिमा बोर्लावार यांच्या ४३ मेंढ्या, भानेश पोचू कंकलवार यांच्या ४१ मेंढ्या वाहून गेल्या आहेत. हे सर्व मेंढपाळ, मौजा भंगाराम तळोधी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून या मेंढपाळाची अहेरी तहसीलदारांनी मेंढ्या पुरात वाहून गेल्याची पंचनाम्यात नोंद केली नाही. त्यामुळे या मेंढपाळांना नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागणार आहे. त्यांच्याही नुकसानीचा अहवाल तयार करून महाराष्ट्र शासनाला पाठविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ जि. चंद्रपूर यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष योगीराज उगे, गुलाब चिडे, गौरव नवले, पपिता येडे रमेश बुचे, नितेश खांडाळकर, दत्तात्रय येडे व समाज बांधव उपस्थित होते.