नोटाबंदी विरोधात काँग्रेसचा घंटानाद

By admin | Published: January 10, 2017 12:44 AM2017-01-10T00:44:55+5:302017-01-10T00:44:55+5:30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला १००० व ५०० च्या नोटा बंद केल्या. त्यामुळे शेतकऱ्यासह जनसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Congress bells against protestors | नोटाबंदी विरोधात काँग्रेसचा घंटानाद

नोटाबंदी विरोधात काँग्रेसचा घंटानाद

Next

उपविभागीय अधिकाऱ्यास निवेदन : तहसील कार्यालयापर्यंत पैदल मार्च
चिमूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला १००० व ५०० च्या नोटा बंद केल्या. त्यामुळे शेतकऱ्यासह जनसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नोटा बदलविताना अनेकांचा बळीही गेला आहे. देशात आर्थिक आणिबाणीसारखी स्थिती निर्माण झाली. या सर्व परिस्थितीचा निषेध म्हणून चिमूर तालुका काँग्रेसतर्फे माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर व गटनेता सतिष वारजुकर यांच्या नेतृत्वात चिमूर शहरात काँग्रेसने घंटानाद आंदोलन केले.
नोटाबंदीला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी शेतकऱ्यासह सर्वसामान्यांना स्वत:च्या पैशासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या नोटबंदीच्या विरोधात संसदेपासून तर गावखेड्यापर्यंत काँग्रेसतर्फे आक्रोश आंदोलनासह आता घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. आज सोमवारी सकाळी काँग्रेस कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत ताटवाट्या, चमचे यांचा नाद करीत तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
घटांनाद आंदोलनादरम्यान तहसील कार्यालयापुढे आल्यानंतर उपस्थित जनसमुदायांना नोट बंदीच्या निषेधार्थ डॉ. अविनाश वारजुकर, गट नेते जि.प. डॉ. सतिष वारजुकर, प्रा. राम राऊत, संजय डोंगरे, गजानन बुटले, राजू देवतळे, राजू दांडेकर, गिता नन्नावरे, लता अगडे, सुनिता चौधरी, वितना मगरे, आदी नेत्याने मार्गदर्शन केले.आंदोलनासाठी नगर परिषद सदस्य कदीर शेख, गोपाल झाडे, कल्पना इंदूरकर, विनोद ठाकूणकर, सुधीर जुमडे, सुरेखा अथरगडे, उमेश बोम्मेवार, किशोर शिंगरे, ग्यानी सिंग, प्रकाश बोकारे, ओम खैरे, मनिष नंदेश्वर, ओंकार चिंचाळकर आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
शेवटी डॉ. अविनाश वारजुकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी हरिष धार्मीक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Congress bells against protestors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.