काँग्रेसच्या नगरसेवकांचे मनपाविरुद्ध ढोल बजाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:23 AM2021-07-17T04:23:13+5:302021-07-17T04:23:13+5:30
ऊर्जानगरातील चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनचे दोन वीजसंच चंद्रपूर मनपा हद्दीत येतात. या दोन्ही संचांपासून शहरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास ...
ऊर्जानगरातील चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनचे दोन वीजसंच चंद्रपूर मनपा हद्दीत येतात. या दोन्ही संचांपासून शहरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होत आहे. करवसुलीसाठी सर्वेक्षण करताना या संचांना वगळण्यात आले. यामुळे मनपाचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले आहे. मनपाने तत्कालीन स्थायी समिती सभापतींच्या मध्यस्थीने २०१२-१३ मध्ये १२ कोटी, २०१३-१४ मध्ये ६ कोटी असे एकूण १८ कोटींचा कर वसूल केला होता. परंतु, मनपा या संचांना जाणीवपूर्वक वगळून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करून काँग्रेसच्या नगरसेवकांनी आज महापौर राखी कंचर्लावार यांच्या दालनात ढोल बजाओ आंदोलन केले. आंदोलनात काँग्रेसचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढिया, सूर्यकांत खनके, अशोक नागपुरे, संगीत भोयर, ललिता रेवल्लीवार, वीणा खनके, देवेंद्र बेले, अश्विनी खोब्रागडे, हरीश कोत्तावार, अनुताई देहगावकर, फारूख सिद्दीकी, उमाकांत धांडे, शालिनी भगत, अरविंद मडावी, राजू बनकर, कुणाल रामटेके, शिरीष तपासे, श्याम राजूरकर, वंदना भागवत, पंकज नागरकर व काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते.