कोरपना येथे पार पडली कॉंग्रेसची सहविचार सभा

By admin | Published: October 24, 2015 12:41 AM2015-10-24T00:41:46+5:302015-10-24T00:41:46+5:30

राज्यात कॉंग्रेसचे शासन असतानाच पृथ्वीराज चव्हाण सरकारने राज्यातील तालुकास्तरावर नगर पंचायत स्थापन करण्याची घोषणा केली होती.

Congress council meeting held at Korapana | कोरपना येथे पार पडली कॉंग्रेसची सहविचार सभा

कोरपना येथे पार पडली कॉंग्रेसची सहविचार सभा

Next

गडचांदूर : राज्यात कॉंग्रेसचे शासन असतानाच पृथ्वीराज चव्हाण सरकारने राज्यातील तालुकास्तरावर नगर पंचायत स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यादृष्टीने युती सरकारने ते अंमलात आणले असून सदर निवडणुकीच्या तयारीसाठी कोरपना येथे मंगळवारी कॉंग्रेसची सहविचार सभा पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुभाष धोटे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीधरराव गोडे, जि.प. सदस्य उत्तम पेचे, जि.म.स. बँकेचे संचालक विजय बावणे, पाशा पटेल, राजुरा विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर, श्याम रणदिवे, सुनिल बावणे व इतर मान्यवर उपस्थीत होते.
अध्यक्षीय भाषणातून सुभाष धोटे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. राजुरा विधानसभा क्षेत्रात कोणत्याही महत्त्वपूर्ण कामाला सुरवात झाली नाही. रस्त्यांची तर अतिशय दुर्दशा झाली आहे. मोदी व फडणवीस सरकारने केवळ निवडणुका जिंकण्यासाठी जनतेला आश्वासने दिली होती. त्यावेळी सर्व मतदार खोट्या आश्वासनाला बळी पडले. मात्र आता जनता जागृत झाली आहे. सरकारचे अपयश लोकांना दिसू लागले आहे. शेती उत्पादनाला भाव नाही, महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकांच्या प्रश्नांना सरकारकडून उत्तरे मिळत नाही अशा शब्दात भाजपवर टीका करून खरपुच समाचार घेतला.
कार्यकर्त्यांच्या भरवशावर कोरपना नगर पंचायतीची निवडणूक लढायची आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजुटीने व जिद्दीने निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही याप्रसंगी त्यांनी केले. संचालन विजय बावणे यांनी केले. यावेळी कोरपना येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भारत निरंजने व बहुजन समाज पक्षाचे भीमरतन भगत यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Congress council meeting held at Korapana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.