मूलमध्ये काँग्रेस तर बल्लारपूर तालुक्यात भाजपचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:00 AM2021-02-06T05:00:00+5:302021-02-06T05:00:57+5:30

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदार संघातील बल्लारपूर तालुक्यातील १० पैकी भाजपने नांदगाव(पोडे), हडस्ती, कोर्टीमक्ता, पळसगाव, मानोरा, गिलबिली, कळमना व आमडी या आठ ग्रामपंचायतींवर तर किन्ही या ग्रामपंचायतीवर अपक्षाचा झेंडा फडकला असलातरी येथेही भाजपला उपसरंपचपद मिळाले आहे. विसापूर या मोठ्या ग्रामपंचायतीवर माजी जि. प. सदस्य रामभाऊ टोंगे यांच्या वंचित आघाडीने एकहाती सत्ता काबीज केली आहे.

Congress dominates in Mul and BJP dominates in Ballarpur taluka | मूलमध्ये काँग्रेस तर बल्लारपूर तालुक्यात भाजपचे वर्चस्व

मूलमध्ये काँग्रेस तर बल्लारपूर तालुक्यात भाजपचे वर्चस्व

Next
ठळक मुद्देसरपंचपदाची निवडणूक : २९ पैकी भाजप- १३, काँग्रेस - ९, अपक्ष - ५, शिवसेना-१, वंचित आघाडी १ जागा


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीनंतर आता सरपंचपदाच्या निवडणुकीला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी मूल तालुक्यातील १९ आणि बल्लारपूर तालुक्यातील १० अशा २९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचीनिवडणूक पार पडली. कुठे अविरोध गतर कुठे चुरशीची निवडणूक झाली. यामध्ये २९ मध्ये तब्बल १३ ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकाविला तर ९ नऊ ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपला ताबा मिळविला. अपक्षांनी ५, तर शिवसेना आणि वंचितने प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदार संघातील बल्लारपूर तालुक्यातील १० पैकी भाजपने नांदगाव(पोडे), हडस्ती, कोर्टीमक्ता, पळसगाव, मानोरा, गिलबिली, कळमना व आमडी या आठ ग्रामपंचायतींवर तर किन्ही या ग्रामपंचायतीवर अपक्षाचा झेंडा फडकला असलातरी येथेही भाजपला उपसरंपचपद मिळाले आहे. विसापूर या मोठ्या ग्रामपंचायतीवर माजी जि. प. सदस्य रामभाऊ टोंगे यांच्या वंचित आघाडीने एकहाती सत्ता काबीज केली आहे.मूल तालुक्यातील १९ पैकी नऊ ठिकाणी काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. यामध्ये नांदगाव, चांदापूर, खालवसपेठ, येरगाव, राजोली, चिखली, मरेगाव, भादूर्णी, हळदी        या ग्रामपंचायतींचा समावेश               आहे. 

सरपंच निवडीने मूल व बल्लारपूर तालुक्यात जल्लोष

मानोरा  ग्रामपंचायतवर        भाजपचा झेंडा
कोठारी : मानोरा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या जीवनकला बाबाजी ढोंगे या विजयी झाल्या. उपसरपंचपदी लहुजी बापूजी टिकले यांची वर्णी लागली.
आमडी ग्रामपंचायत 
भाजपाच्या ताब्यात
कोठारी : आमडी ग्रामपंचायतीवर भाजपाने सत्ता काबीज केली असून सरपंच म्हणून श्वेता गिरीधर कुळसंगे यांची निवड करण्यात आली.
नांदगाव ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीचा झेंडा
सरपंचपदी हिमाणी वाकुडकर तर उपसरपंच सागर देऊरकर विजयी झाले.
घोसरी :   मूल तालुक्यातील ग्रामपंचायत नांदगाव येथील सरपंच-उपसरपंच पदाची निवड पीठासीन अधिकारी ए. के. बाबर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सरपंचपदी हिमाणी दशरथ वाकुडकर तर उपसरपंचपदावर सागर गजानन देऊरकर यांची अविरोध निवड करण्यात आली. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या नांदगाव ग्रामपंचायत निवडणुकीत तीन गटांत चुरशीचा सामना झाला. दशरथ वाकुडकर यांच्या काँग्रेस-शिवसेनाप्रणीत  महाविकास आघाडीचे अनपेक्षितपणे सहा सदस्य निवडून आले.
विसापूर ग्रा. पं. सरपंचपदी    वंचितच्या वर्षा कुळमेथे
विसापूर :  तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीच्या वर्षा मच्छिंद्र कुळमेथे या किसान मजदूर काँग्रेसच्या सहकार्याने सरपंचपदावर विराजमान झाल्या. त्यांना १० मते मिळाली. विरोधातील भाजपा समर्थित सुवर्णा महिंद्र कुसराम यांना सात मते मिळाली. उपसरपंचपदासाठी दावेदार असणारे वंचित आघाडीचे माजी पं.स. उपसभापती अनकेश्वर मेश्राम यांचा नऊ मतांनी विजय झाला. त्यांच्याविरोधात उभे असणारे शिवसेनेचे प्रदीप गेडाम यांना ८ मते मिळाली.  नांदगाव पोडे येथे सरपंचपदासाठी चांगलीच रस्सीखेच झाली. सरपंचपदासाठी तीन उमेदवारांनी आवेदनपत्र भरले. त्यामध्ये भाजपाचे दोन गट व महाविकास आघाडीच्या एक यामुळे चांगलीच चुरस निर्माण झाली. पंचायत समिती सदस्य गोविंदा पोडे यांच्या गटाच्या प्राजक्ता अनिल उरकुडे या सरपंच झाल्या. त्यांना ५ मते मिळाली. त्यांच्याविरोधात उभी असणारी मनोहर देऊळकर गटाच्या त्यांची सून मंजू देऊळकर यांना ४ मते, माजी सरपंच मधुकर पोडे  समर्थित महाविकास आघाडी गटाच्या पुष्पलता वाढई यांना २ मते मिळाली. तर याच गटाच्या (महाविकास आघाडी) नीलिमा राहुल दुधे या उपसरपंच झाल्या. त्यांना सात मते मिळाली. 
एकंदरीत सरपंच उपसरपंच हे पोडे समर्थित गटाचेच झाले. हडस्ती येथे भाजपाच्या अंजली गुरुदास पारखी सरपंचपदावर विराजमान झाल्या. उपसरपंच नारायण भोयर हे बिनविरोध निवडून आले.

 

Web Title: Congress dominates in Mul and BJP dominates in Ballarpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.