केंद्र सरकारविरोधात चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात काँग्रेसचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:29 AM2021-03-27T04:29:18+5:302021-03-27T04:29:18+5:30
कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी मागील १०० दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक शेतकरी शहीद झाले आहेत. केंद्र ...
कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी मागील १०० दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक शेतकरी शहीद झाले आहेत. केंद्र सरकारने आधी चर्चेचा देखावा केला. मात्र, आता या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर अनेक आंदोलने करण्यात आली. खासदार राहुल गांधी यांनी पंजाब, हरियाणा या राज्यात ट्रॅक्टर रॅली काढून सहभाग दर्शविला आहे. काँग्रेसच्या पुढाकारातून सुमारे ६० लाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवून कृषी विधेयके रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. आंदोलनात ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, कामगार नेते के. के. सिंग, विनोद दत्तात्रय, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, महिला काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, नम्रता ठेमस्कर, गोपाल अमृतकर, संतोष लहामगे, प्रशांत दानव, ललिता रेवल्लीवार, कुणाल चहारे, हरीश कोतावार, राजेश अडूर, रोशन पचारे, पवन आगदारी, सोहेल शेख, रुचित दवे, भालचंद्र दानव, मनीष तिवारी, अॅड. शहा, अश्विनी खोबरागडे, अॅड. मानी दारला, अनू दहागावकर, राजू रेड्डी, प्रसन्ना शिरवार, प्रवीण पडवेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.