१६ पैकी दहा ग्रामपंचायतीत काँग्रेसचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:16 AM2018-09-28T00:16:33+5:302018-09-28T00:17:04+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. गुरुवारी निकाल घोषित करण्यात आला. यात १६ पैकी दहा ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व स्थापित केले आहे. भाजपाला मात्र दोनच ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले.

Congress flag of 10 out of 16 gram panchayats | १६ पैकी दहा ग्रामपंचायतीत काँग्रेसचा झेंडा

१६ पैकी दहा ग्रामपंचायतीत काँग्रेसचा झेंडा

Next
ठळक मुद्देभाजपाच्या खात्यात फक्त दोन जागा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. गुरुवारी निकाल घोषित करण्यात आला. यात १६ पैकी दहा ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व स्थापित केले आहे. भाजपाला मात्र दोनच ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले. दोन ग्रामपंचायतीवर गोंडवाना गणतंत्र पार्टीने झेंडा रोवला.
भेजगाव काँग्रेस तर सिंतळात भाजप
मूल : तालुक्यातील भेजगाव ग्रामपंचायतीवर काँग्रेस तर सिंतळा ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. भेजगाव येथे सरपंच पदाचे काँग्रेसचे उमेदवार अखिल गांगरेड्डीवार तर सिंतळा येथे भाजपाचे विलास चापडे निवडून आले आहेत.
भेजगाव येथे सरपंचासह काँग्रेस तीन तर भाजपा आठ व सिंतळा येथे सरपंचासह सर्वच सातही सदस्य निवडून आले. सिंतळा येथे भाजपाच्या विजयी उमेदवारात किशोर चलाख, पुष्पा बुरांडे, तिमाजी चलाख, उज्ज्वला कोठारे, प्रकाश वासेकर, रेखा किरमे, शितल वासेकर तर भेजगाव येथे भाजपाचे चेतना ठाकरे, रमेश वेलके, चेतना कुळमेथे, बबन लेनगुरे, जलीद मोहुले, कविता पिपरे, चंदा गेडाम तर काँग्रेसचे विवेकानंद उराडे, वनिता लेनगुरे, वैशाली गेडाम, आदी निवडून आले. भेजगाव येथे काँग्रेसचे सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले.
मोखाळा ग्रामपंचायतीत काँग्रेस
सावली : २५ वर्षाची सत्ता कायम ठेवण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या भाजपाचे मोखाळा ग्रामपंचायतीमध्ये पाणीपत झाले आहे. काँग्रेसने आपला झेंडा रोवून आजही मतदारांच्या मनात कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
तालुक्यातील मोखाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गत २५ वर्षापासून भाजपाने आपले वर्चस्व शाबूत ठेवले होते.
परंतु या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून पानीपत केले आहे. नऊ सदस्यांपैकी सहा सदस्य आणि सरपंच पद काँग्रेसने आपल्या तंबुत परत आणले आहे.
सरपंच म्हणून सुरेश गोडशेलवार, सदस्य सुनिता राजेश थेरकर, वनिता भोयर, संदीप जुनघरे, संजय नागोसे, माया चांदेकर, माधुरी भोयर तर भाजपाच्या तीन पैकी अविरोध शोभा ताराचंद गंडाटे, आणि गणेश आडुरवार, शरामसुंदर रोहणकर, हे निवडून आले आहेत.
कहालीत काँग्रेस
ब्रम्हपुरी : तालुक्यातील कहाली ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदी राजू मूर्लीधर नान्हे विजयी झाले आहेत. सरपंच पदासाठी एकूण सहा उमेदवारांनी झुंज दिली होती. मतमोजणी झाली असता सरपंचपदी काँग्रेसचे राजू मुरलीधर नान्हे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी विवेक महादेव पिल्लेवान यांचा अकरा मतांनी पराभव केला. सात सदस्यीय ग्रामपंचायत निवडणुकीत तीन सदस्य यापूर्वीच अविरोध निवडून आले होते, तर चार जागांसाठी निवडणूक घेतली असता मकरंद मनोज माकोडे, शशिकला गजानन घुटके, धर्मा लहानू पिल्लेवान, आशिष पुंडलिक पिल्लेवान हे विजयी झाले आहेत तर तृप्ती राजेंद्र घोरमोडे, चंदा चंद्रशेखर डांगे, स्वाती संदीप दिघोरे हे अविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी घोषित केले.
पांढरकवड्यात काँग्रेसचा झेंडा
घुग्घुस : नजीकच्या पांढरकवडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्राम सुधार पॅनल काँग्रेसचे सुरज तोतडे यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीत ३८४ मते घेऊन भाजपचे सहदेव कोल्हे यांचा ६५ मतांनी पराभव केला. ग्राम सुधार पॅनल काँग्रेसच्या अर्चना रोगे अविरोध तर सचिन टिपले, मोनिका वाडगुरे, अर्चना गावंडे हे निवडून आले. भाजपच्या संगीता नामदेव सोनटक्के, समीर बबन भिवापूरे, कन्हैया उध्दव तोतडे निवडून आले.
रामपुरात युतीचा तर आर्वीत काँग्रेसचा सरपंच
सास्ती : राजुरा तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायतीवर राष्टÑवादी काँग्रेस, भाजपा व शेतकरी संघटनेने केलेल्या युतीच्या उमेदवाराला सरपंच पदावर आरुढ होण्याचा मान मिळाला. सत्ताधारी शिवसेनेला मात्र अंतर्गत फटका बसला असून युतीच्या वंदना नामदेव गौरकार यांनी १९३ मतांनी विजय संपादन केला असून काँग्रेसच्या पूजा मंगेश बोबडे यांना पराभव पत्करावा लागला तर सत्ताधारी शिवसेनेच्या उमेदवारांना मात्र मतदारांनी घरची वाट दाखविली. युतीसमोर शिवसेना व काँग्रेस पक्षाने स्वतंत्र उमेदवार उभे करुन तगडे आव्हान उभे केले होते. परंतु शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे काँग्रेसला कभी खुशी कही गम तर युतीचा विजय झाला आहे. तर आर्वीत काँग्रेस पक्षाच्या सरपंच पदाचा उमेदवार शालू विठ्ठल लांडे या ५३ मतांनी निवडून आल्या असून भाजपाच्या वंदना कुळसंगे यांना पराभव पत्कारावा लागला आहे. शिवसेनेने पहिल्यांदाच आर्वी येथे कवडी झुंज दिली आहे. अकरा सदस्य संख्या असलेल्या रामपूर ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. यात सत्ताधारी शिवसेना पक्षात दुफळी निर्माण झाल्याने काँग्रेस पक्षाने आपले प्रस्त वाढविले. यात समविचारी कार्यकर्ते एकत्र येत राष्टÑवादी काँग्रेस, भाजपा व शेतकरी संघटना यांनी रामपूर ग्रामविकास पॅनल तयार करुन निवडणूक लढली. यात युतीच्या सरपंच पदाच्या वंदना गौरकार या विजयी झाल्या तर वॉर्ड क्र. एक मधून सदस्य पदाकरिता युतीचे विलास कोदीरपाल व सिंधू लोहे, वॉर्ड क्र. २ मधून युतीचे अनिता आडे, सुनीता उरकुडे तर काँग्रेसचे शितल मालेकर, वॉर्ड क्र. ३ मध्ये शिवसेनेचे अजय सकिनाला, रमेश झाडे, संगीता विधाते, वॉर्ड क्र. ४ मध्ये युतीचे हेमलता ताकसांडे, काँग्रेसचे जगदीश बुटले, लक्ष्मी चौधरी विजयी झाल्या. आर्वी ग्रामपंचातीमध्ये भाजपाची एकहाती सत्ता होती. मात्र येथील सरपंचाला असलेला विरोध पाहता येथील जनतेनी काँग्रेसच्या शालू लांडे यांना सरपंचपदी निवडून दिले. तर सदस्यांमध्ये काँग्रेसकडून भास्कर डोंगे, उषा उपरे, सुभाष काटवले, तानेबाई कोहपले निवडून आल्या तर शिवसेनेच्या वंदना मुसळे, मारोती महकुलकर, बंडू आईलवार, सूवर्णा महाकुलकर तर भाजपाचा एकमेव सदस्य वारलू रामटेके निवडून आला आहे.

Web Title: Congress flag of 10 out of 16 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.