चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पालिकेत काँग्रेसचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 02:11 PM2018-12-10T14:11:40+5:302018-12-10T14:12:11+5:30
ब्रह्मपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यात काँग्रेसने २० पैकी ११ जागांवर विजय मिळवित स्पष्ट बहुमत घेतले. नगराध्यक्षाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या रिता उराडे यांनी बाजी मारली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यात काँग्रेसने २० पैकी ११ जागांवर विजय मिळवित स्पष्ट बहुमत घेतले. नगराध्यक्षाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या रिता उराडे यांनी बाजी मारली.
संंपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून असलेल्या ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण ३० हजार ८१५ मतदार होते. त्यापैकी २१ हजार ७३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १०७ उमेदवार रिंगणात होते. सोमवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. दुपारपर्यंत संपूर्ण निकाल समोर आला. नगराध्यक्षच्या थेट निवडणुकीत काँग्रेसच्या रिता उराडे यांनी तीन हजार ५५० मतांनी विदर्भ माझा पार्टीच्या अर्पिता दोनाडकर यांचा पराभव केला. रिता उराडे यांना ८०२० तर अर्पिता दोनाडकर यांना ४४७० मते मिळाली. भाजपाचे अश्विन लाखानी ३८७२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. नगरसेवक पदाच्या २० जागांपैकी ११ जागा काँग्रेसने पटकाविल्या. विमापाला सहा तर भाजपाला तीन जागांवरच समाधान मानावे लागले.