भारनियमनविरूद्ध काँॅग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:50 PM2018-10-29T22:50:09+5:302018-10-29T22:50:37+5:30

वरोरा व भद्रावती तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमणामुळे रब्बी हंगामातील ओलीत पीके धोक्यात आली असून शेतकरी संकटात सापडला आहे. भारनियमन बंद करा, या मागणीसाठी कॉग्रेस नेते डॉ. विजय देवतळे यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या वरोरा येथील विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला.

Congress Front Against Weightlifting | भारनियमनविरूद्ध काँॅग्रेसचा मोर्चा

भारनियमनविरूद्ध काँॅग्रेसचा मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : वरोरा व भद्रावती तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमणामुळे रब्बी हंगामातील ओलीत पीके धोक्यात आली असून शेतकरी संकटात सापडला आहे. भारनियमन बंद करा, या मागणीसाठी कॉग्रेस नेते डॉ. विजय देवतळे यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या वरोरा येथील विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला.
वरोरा- भद्रावती तालुके भार नियमनमुक्त करावे, कृषी पंपाला व नळयोजनेस २४ तास अखंडीत विद्युत पुरवठा द्यावा. कृषी पंपाकरीता डिमांड भरलेल्या शेतक-यांना १५ दिवसात नवीन कनेक्शन देण्यात यावे, वाढीव वीज बिज कमी करावे, विजबीलाचा दर कमी आकारण्यात यावा या प्रमुख मागण्यासाठी काँग्रेसच्या वरोरा कार्यालयातून हा मोर्चा काढण्यात आला.
वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी मोर्चाला सामोरे जावून निवेदन स्वीकारले. यावेळी ग्रामीण भागातील आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या व रोषही व्यक्त केला यावेळी कॉग्रेस नेते डॉ.
विजय देवतळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. आसावरी देवतळे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष मिलींद भोयर, भद्रावती तालुका अध्यक्ष भगतसिंगमालसुरे, शेतकी खरेदी वीक्री संस्थेचे अध्यक्ष गिरीधर कष्टी, अरुण फुंदे, संदीप दिडमिशे, पं. स.सदस्य संजविनी भोयर, दुर्गा ठाकरे, प्रतीमा जोगी, दिलीप ठेंगे आदी पदाधिकारी ऊपस्थित होते.
काच कंपनीची लीज रद्द करा
चंद्रपूर : चंद्रपुरातील एका काच कंपनीला १९७५-७६ मध्ये जमीन देण्यात आली. कंपनी बंद होऊन बरीच वर्षे झाली. जागेचा दुरूपयोग सुरू असल्याने लीज रद्द करा, या मागणीसाठी सोमवारी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे माजी महासचिव सुधाकर कातकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा नेला.
काच कंपनीला देण्यात आलेली जमीन वर्ग एकची होती. मात्र, गैरमार्गाने वर्ग दोन केली. ३१ जुलै १९९१ ला नुतणीकरण झाले. त्याची चौकशी करावी, शहरातील झोपडपट्टीधारकांना जमिनीचे पट्टे द्यावे, याकडे सिध्दार्थ सोनटक्के, हरिनाथ यादव, विजय पोहणकर, अन्नाजी कोल्हे यांनी लक्ष वेधले.

Web Title: Congress Front Against Weightlifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.