महागाईविरोधात काँग्रेसची गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:04 PM2017-09-18T23:04:15+5:302017-09-18T23:04:35+5:30

महागाई कमी करून इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, या आशेवर जनतेने मोदी सरकारला निवडून दिले.

Congress' Gandhinagar against inflation | महागाईविरोधात काँग्रेसची गांधीगिरी

महागाईविरोधात काँग्रेसची गांधीगिरी

Next
ठळक मुद्देमतदारात जागर : फूल देऊन केला भाजपा सरकारचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महागाई कमी करून इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, या आशेवर जनतेने मोदी सरकारला निवडून दिले. मात्र याच सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर वस्तूंचे दर वाढवून सर्वसामान्यांना बेजार केले आहे. या अन्यायाच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने जिल्हाभरात गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात गांधी चौक व जटपुरा गेटवर नागरिकांना गुलाबाचे फूल देऊन मतदारांना जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आज सोमवारी सकाळी ११ वाजता येथील गांधी चौकात काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित आले. त्यानंतर या मार्गावरून जाणाºया प्रत्येक नागरिकास सरकारचा निषेध करणारे पत्रक गुलाबाचे फूल देऊन वाढती महागाईचा विरोध करण्यात आला. यावेळी भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजीही करण्यात येत होती. त्यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणा देत जटपुरा गेटवर पोहचले. तिथेही नागरिकांना गुलाबाबे फूल देत भाजपाने ‘अच्छे दिन’च्या नावावर कशी फसवणूक केली, याबाबत सांगण्यात येत होते. आंदोलनात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गजानन गावंडे, राहुल पुगलिया, डॉ. सुरेश महाकूळकर, कुशल पुगलिया, अविनाश ठावरे, अशोक नागापुरे, देवेंद्र बेले, सकिना अन्सारी, विना खनके, प्रविण पडवेकर, नासीर खान, भास्कर माकोडे, मेघा भाले, वसंत मांढरे, रामदार वाग्दरकर, किष्णन नायर, चंद्रशेखर पोडे व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ही नागरिकांची फसवणूक - नरेश पुगलिया
मोदी सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावावर देशातील नागरिकांची फसवणूक केली आहे. महागाई एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे की सर्वसामान्य जनतेला जीवन जगणेच कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर भरमसाठ वाढवून जनतेची घोर निराशा केली आहे. अशा सरकारचा आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर निषेध करीत आहोत, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Congress' Gandhinagar against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.