कोरपना येथे काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:41 PM2017-09-22T23:41:04+5:302017-09-22T23:41:24+5:30

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार महाराष्ट्रभर सुरू असलेल्या महागाईविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन कोरपना तालुका काँग्रेस कमिटीतर्फे ....

Congress movement at Korpana | कोरपना येथे काँग्रेसचे आंदोलन

कोरपना येथे काँग्रेसचे आंदोलन

Next
ठळक मुद्देशासनाचा निषेध : वाढत्या महागाईचा केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार महाराष्ट्रभर सुरू असलेल्या महागाईविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन कोरपना तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात तहसील कार्यालय कोरपना येथे गुरुवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या अकार्यक्षमतेमुळेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. दिवसेंदिवस महागाई उच्चांक प्रस्थापित करीत आहे. महागाई नियंत्रणात आणून सर्वसामान्यांना स्वस्त दारात वस्तू उपलब्ध करून देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेत असलेल्या भाजपा सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. जनतेचे अच्छे दिनाचे स्वप्न धूसर झाले आहे. सरकारच्या या अकार्यक्षमतेविरोधात आणि वेगाने वाढणाºया महागाईविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे यांच्या आदेशानुसार काल आंदोलन करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष विठ्ठल थिपे यांनी केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर गोडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, सभापती शाम रणदिवे, माजी जि.प. सदस्य उत्तम पेचे, जि.प. सदस्य शिवचंद्र काळे, विनाताई मालेकर, कल्पना पेचे, उपसभापती संभाजी कोवे, नगराध्यक्ष नंदा बावणे, युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, विजय ठाकूरवार, उपनगराध्यक्ष मसूद अली, गडचांदूर येथील गटनेते पापय्या पोन्नमवार, घनश्याम नांदेकर, विलास मडावी, झीबल जुमनाके, प्रभाकर क्षीरसागर, अशोक आस्कर यांच्यासह कोरपना तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अल्पसंख्यांक सेल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर
कोरपना : वाढलेले विजदर, सतत होत असलेले भारनियमन, डिजेल-पेट्रोल दरवाढ यामुळे वाढणाºया महागाईच्या निषेधार्थ कोरपना तालुका शिवसेनेच्या वतीने बुधवारी तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन देऊन तहसीलदाराला निवेदन देण्यात आले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच विदर्भ संपर्क प्रमुख तथा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार बाळू धानोरकर यांच्या मार्गदर्शनार्थ युवासेना जिल्हा प्रमुख सचिन भोयर, उपजिल्हा प्रमुख धनंजय छाजेड, तालुका प्रमुख प्रकाश खनके यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय कोरपना येथे धरणे दिले. सतत वाढत असलेली महागाई, वाढलेले वीजदर, यामुळे सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. प्रत्येक बाबतीत भाजपा सरकार अपयशी ठरली असून येणाºया काळात जनता भाजपा सरकारला त्यांची जागा दाखविणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख धनंजय छाजेड यांनी म्हटले. युवासेनेचे जिल्हाप्रमुख सचिन भोयर यांनीही सरकार विरोधात परखड मत व्यक्त केले. यावेळी नत्थू मत्ते, राजू मुळे, सुनील गोरे, मनोज इटनकर, नितिन डाखरे, नितिन महागोकार, नितिन धांडे, दादाजी मोहुर्ले तसेच तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress movement at Korpana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.