एकजुट काँग्रेस-राष्ट्रवादीची, पण विजय भाजपचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:02 AM2018-05-25T00:02:15+5:302018-05-25T00:02:15+5:30

२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार मितेशकुमार भांगडिया यांनी अत्यल्प संख्याबळ असताना २०० मतांच्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहुल पुगलिया यांचा पराभव केला होता.

Congress-NCP jointly, but Vijay BJP | एकजुट काँग्रेस-राष्ट्रवादीची, पण विजय भाजपचा

एकजुट काँग्रेस-राष्ट्रवादीची, पण विजय भाजपचा

Next

चंद्रपूर : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदार संघाची निवडणूक जिंकून भाजपला गड राखण्यात यश आले खरे, परंतु एकतर्फी निवडणुकीचे चित्र असताना भाजपला विजयासाठी चांगलीच कसरत करावी लागली. दोन्ही उमेदवारांत केवळ ३७ मतांचा फरक बघता या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, अन्य पक्ष व अपक्षांची एकजुट झाल्याचे दिसून येते. आणि ही एकजुट आगामी निवडणुकांसाठी भाजपला धोक्याची घंटाच आहे.
२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार मितेशकुमार भांगडिया यांनी अत्यल्प संख्याबळ असताना २०० मतांच्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहुल पुगलिया यांचा पराभव केला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. या निवडणुकीत काँग्रेसने संख्याबळ कमी असताना ४९१ मतांपर्यंत मजल मारली.
या मतदार संघात भाजप ४८३, शिवसेना ४५, काँग्रेस २४९, राष्ट्रवादी काँग्रेस ७१ आणि अपक्ष व इतर पक्ष मिळून २११ असे एकूण १०५९ मतदार होते. मतांच्या आधारे भाजपचेच पारडे जड होते. भाजपचे सर्व आघाड्यांवरील नियोजन बघता मोठ्या फरकाने भाजपा उमेदवार विजयी होतील, असे चित्र होते. निकालाअंती भाजप उमेदवार रामदास आंबटकर यांना ५२८ आणि काँग्रेस उमेदवार इंद्रकुमार सराफ यांना ४९१ मते मिळाली. केवळ ३७ मतांचा फरक विचारात घेता या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने कडवी झुंज दिल्याचे स्पष्ट झाले. भाजपकडून रामदास आंबटकर यांच्या नावावर काही महिन्यांपूर्वीच शिक्कामोर्तब झाले होते. काँग्रेसची खेळी जाणून घेण्यासाठी भाजपने अखरेच्या क्षणापर्यंत उमेदवाराचे नाव गुप्त ठेवले होते. काँग्रेस गोटात मात्र उमेदवाराचीच वानवा होती. मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होतो, या पुर्वानुभवाच्या आधारे काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास दमदार उमेदवार पुढे येण्यास कचरत होता. ही बाब हेरून भाजपने संघाचे सक्रिय कार्यकर्ते रामदास आंबटकर यांच्या नावावर बाजी लावली.
इकडे काँग्रेस नेते उमेदवाराच्याच शोधात होते. नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या काही तासांपूर्वी काँग्रेसने अपक्ष म्हणून नामांकन दाखल करायला आलेल्या इंद्रकुमार सराफ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली.

Web Title: Congress-NCP jointly, but Vijay BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.