काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना चंद्रपूरचे निमंत्रण
By admin | Published: October 5, 2016 12:58 AM2016-10-05T00:58:33+5:302016-10-05T00:58:33+5:30
स्थानिक गांधी चौक येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येत असून...
संयुक्त बैठक : मुंबई येथे अहवाल सादर
चंद्रपूर : स्थानिक गांधी चौक येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येत असून त्याकरिता प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना प्रस्तावित ८ आॅक्टोबर रोजीच्या मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले.
प्रदेश काँग्रेसतर्फे दादर येथील टिळक भवन येथे महाराष्ट्रातील सर्व विभागीय काँग्रेस उमेदवार, आमदार, निरीक्षक, प्रभारी, समन्वयक व ग्रामीण-जिल्हा-शहर अध्यक्षांची संयुक्त बैठक बोलविण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी आपला अहवाल सादर करून चंद्रपूर शहराची परिस्थिती मांडली आणि त्यांना सर्व बाबींचा खुलासा करून निदर्शनास आणून दिले.
जिल्ह्याचे निरीक्षक एस. क्यू. जमा व प्रमोद तितरमारे यांना निर्देश दिले की, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष फक्त नंदू नागरकर अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमेटीची मान्यता असल्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच स्थानिक नेत्यासोबत समन्वय साधून पुढील पक्ष कार्यकर्ता मेळावे, बुथ कमेटी व संघटन बांधणी आणि सर्व मनपा नगरसेवक व पदाधिकारी यांनी पक्षाचे ध्येय धोरणाप्रमाणे आणि वेळेवर सुचविलेल्या निर्देशाप्रमाणे पक्षाचे कार्य करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर मनपाद्वारे झालेल्या घर टॅक्स वाढीचा व भ्रष्टाचाराने फोफवलेल्या विषयावर चर्चा झाली. काँग्रेस कमेटीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करून भारतीय जनता पार्टीला नामोहरण केले आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीला जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील, यावर काम करावे, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यात ८ आॅक्टोबर रोजी प्रांताध्यक्ष अशोक चव्हाण येत आहेत. त्यासाठी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीने काँग्रेस कार्यकर्ता मेळावा स्थानिक गांधी चौक येथे घेण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
या विभागीय बैठकीला चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार-उपगटनेता विजय वडेट्टीवार, प्रदेश महासचिव गणेश पाटील, एस.क्यु. झामा माजी आमदार तथा निरीक्षक, निरीक्षक प्रमोद तितरमारे, प्रदेश सचिव डॉ. आसावरी देवतळे, विनोद दत्तात्रय आणि नागपूर विभागाचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)