काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर

By admin | Published: August 2, 2016 01:41 AM2016-08-02T01:41:46+5:302016-08-02T01:41:46+5:30

बल्लारपृर बायपासलगत असलेल्या पागलबाबा नगराजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालासाठी असलेली

Congress workers again on the road | काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर

काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर

Next

दिवसभराचे धरणे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जागा न बदलल्यास आंदोलनाचा इशारा
चंद्रपूर : बल्लारपृर बायपासलगत असलेल्या पागलबाबा नगराजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालासाठी असलेली प्रस्तावित जागा सर्व दृष्टीने अयोग्य आहे. ही जागा बदलून सोईच्या जागेवर हे महाविद्यालय उभारले जावे, या मागणीसाठी सोमवारी जिल्हा एनएसयुआय आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर धरणे दिले. या जागेचा फेरविचार झाला नाही तर, भविष्यात आंदोलन उभाऱ्याचा इशाराही यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आला.
चंद्रपूर जिल्हा एनएसयुआयने १ आॅगस्टला स्थानिक गांधीचौकात धरणा देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी सकााळी ११ वाजतापासून या धरण्याला प्रारंभ झाला. एनएसयुआयच्या आवाहनावरून पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादलाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही यात सहभाग घेतला. भर पावसातही या मागणीसाठी नागरिक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकवटले होते. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून या संदर्भातील एक निवेदन सादर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या मागणीसाठी निवदेन पाठवून आपल्या भावना कळविण्यात आल्या.
पागलबाबा नगरजवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रस्तावित केलेली जागा सर्व दृष्टीने गैरसोईची असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या जागेलगतच महानगर पालिकेचा डंपिग यार्ड असल्याने आणि काही अंतरावर एमईएल प्रकल्प असल्याने या परिसरात मोठ्या प्रमावर प्रदुषण आणि दुर्गंधी असते. त्यामुळे ही जागा रूग्णांच्या दृष्टीने कशी योग्य ठरू शकते, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

नागरिकांच्या आरोग्याचा तर विचार करा - पुगलिया
या संदर्भात धरणास्थळी दुपारी माजी खासदार नरेश पुगलिया यांची पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, वाहतूक, दळणवळण, स्वच्छता, प्रदुषण या सर्व दृष्टीने पागलनगर परिसरातील जागा अयोग्य आहे. तरीही या जागेसाठी सरकारचा हेका कशासाठी आहे, हे समजायला मार्ग नाही. निदान नागरिकांच्या आरोग्यचा आणि गैरसोईचा विचार करून तर जागा ठरवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नरेश पुगलिया म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अन्य जागा निश्चित करण्याची गरज आहे. ही जागा उंचसखल असल्याने ती समतल करण्यासाठी ६५ कोटी रूपयांचा अनाठायी खर्च होणार आहे. प्रदुषण आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य येथे धोक्यात आहेच, सोबतच, जवळच जुनोना जंगल असल्याने वन्यप्राण्यांचा वावर या परिसरात असतो. त्यामुळे रात्री येणाऱ्या रूग्णांच्या दृष्टीने पूर्णत: गैरसोईचे आहे. ही जागा शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. प्रस्तावित जागेचे भौगोलिक क्षेत्रही चांगले नाही. रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकापासून हे अंतर अधिक असल्याने ग्रामीण नागरिकांची गैरसोयच होणार आहे. यामुळे सरकारने या बाबींचा गंभीरपणे विचार करायला हवा, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला कव्वाल मसीज शोला, गजानन गावंडे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल तिवारी, प्रदेश उपाध्यक्ष रोशनलाल बिट्टू, जिल्हा उपाध्यक्ष काशिफ अली, दुर्गेश चौबे, नगरसेवक प्रवीण पडवेकर, अशोक नागापुरे, प्रशांत दानव माजी नगराध्यक्ष डॉ.सुरेश महाकुलकर यांच्यासह नगरसेवक, तसेच काँंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress workers again on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.