जिल्हा परिषदेत काँग्रेस तर पंचायत समितीत भाजप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2017 01:21 AM2017-02-24T01:21:35+5:302017-02-24T01:21:35+5:30
अतिशय उत्कंठा असलेल्या निकालाअंती जिल्हा परिषदेच्या पाच गटापैकी तिन जागा जिंकून काँग्रेसने सरशी साधली आहे
रवी रणदिवे ब्रह्मपुरी
अतिशय उत्कंठा असलेल्या निकालाअंती जिल्हा परिषदेच्या पाच गटापैकी तिन जागा जिंकून काँग्रेसने सरशी साधली आहे तर पंचायत समितीवर दहा गणापैकी नऊ जागा भाजपाने जिंकून एकहाती सत्ता काबीज केली आहे.
आज गुरुवारी सकाळी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीत पार पडलेल्या मतमोजणीचे अंतिम चित्र याप्रमाणे आहे. नान्होरी-अऱ्हेरनवरगाव जि.प. गटातून भाजपाचे क्रिष्णा सहारे यांनी विद्यमान सभापती नेताजी मेश्राम यांना तीन हजारपेक्षा जास्त मतांनी पराभूत केले आहे. पिंपळगाव-मालडोंगरी गटातून काँग्रेसच्या स्मिता पारधी यांनी भाजपाच्या नंदा बनकर यांना पराभूत केले आहे. खेडमक्ता-चौगान गटातून भाजपाच्या दिपाली मेश्राम यांनी काँग्रेसच्या स्नेहा मोटघरे यांचा दोन हजारांनी पराभव केला आहे. गांगलवाडी, मेंडकी गटातून काँग्रेसचे प्रमोद चिमूरकर यांनी भाजपाच्या वंदना शेंडे यांचा पराभव केला आहे. आवळगाव-मुडझा गटात विद्यमान जि.प. सदस्य राजेश कांबळे यांचा निसटता विजय झाला असून त्यांनी भाजपाचे शंकर सातपुते यांचा पराभव केला आहे. जि.प. क्षेत्र काँग्रेस ३ तर भाजप २ जागांवर विजय झाली आहे.
पंचायत समितीच्या दहा गणासाठी नान्होरी गणात ममता कुंभारे (भाजप) यांनी सुजाता मेश्राम (काँग्रेस) यांचा पराभव केला आहे. अऱ्हेरनवरगावमध्ये भाजपाचे विलास उरकुडे यांनी बिआरएसपीचे जितेंद्र गणवीर यांचा पराभव केला आहे. पिंपळगाव गणात भाजपाच्या सुनंदा ढोरे यांनी काँग्रेसच्या उर्मिला गडे यांना नमविले आहे. मालडोंगरी गणात भाजपाच्या उर्मिला धोटे यांनी काँग्रेसच्या वैशाली नाकतोडे यांना हरविले आहे. खेडमक्ता गणात भाजपाचे प्रकाश नन्नावरे यांनी शिवसेनेचे सुनिल तोडासे यांना पराभूत केले आहे. चौगान गणात भाजपाच्या प्रणाली मैद यांनी काँग्रेसच्या भाग्यश्री प्रधान यांना हरविले आहे. गांगलवाडी गणात भाजपाच्या सुनिता ठक्कर यांनी काँग्रेसच्या सुचित्रा ठाकरे यांना नमविले आहे. मेंडकी गणात काँग्रेसने बाजी मारली असून थानेश्वर कायरकर यांनी भाजपाच्या राजेंद्र दोनाडकरांनी काँग्रेसच्या दिवाकर किरमिरे यांना हरविले आहे तर मुडझा गणात भाजपाचे निलकंठ मानापुरे यांनी काँग्रेसच्या नरेंद्र नखाते यांना हरविले आहे. पंचायत समितीमध्ये नऊ जागा भाजपाने जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे.