गडचांदुरात काँग्रेसचा एल्गार मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:42 PM2018-03-12T23:42:49+5:302018-03-12T23:42:49+5:30
राजुरा विधानसभा युवक काँग्रेस, कोरपना तालुका काँग्रेस कमिटी व गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी रविवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
गडचांदूर : राजुरा विधानसभा युवक काँग्रेस, कोरपना तालुका काँग्रेस कमिटी व गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी रविवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला.
अचानक चौक ते बसस्थानकापर्यंत काढण्यात आलेल्या सदर मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने देशातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेचे हाल केले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. पेट्रोल, डिझेल व सिलिंडरचे दर गरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. भ्रष्टाचार वाढला आहे. जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण केले जात आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. चार वर्षांपासून एपीएल शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद करण्यात आले. दारिद्य्र रेषेखालील लोकांची रेशनवरील साखर बंद करण्यात आली. गडचांदुरातील अनेक समस्या दुर्लक्षित आहेत. आदिवासी गुड्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहे.
अशा विविध २० मागण्यांसाठी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या निषेधार्थ एल्गार मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, राजुरा काँग्रेसचे अध्यक्ष दादा पाटील लांडे, माजी सभापती नागराज मंगरुळकर, महेंद्र ताकसांडे, डॉ. अनिल चिताडे, गटनेते पापय्या पोन्नमवार आदी उपस्थित होते.