काँग्रेसची प्रतिमा पारदर्शक व कार्यक्षम

By admin | Published: October 21, 2016 01:08 AM2016-10-21T01:08:43+5:302016-10-21T01:08:43+5:30

भाजपा वाचाळविरांचा पक्ष आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी जनतेला मोठमोठी स्वप्न दाखविली.

Congress's image is transparent and efficient | काँग्रेसची प्रतिमा पारदर्शक व कार्यक्षम

काँग्रेसची प्रतिमा पारदर्शक व कार्यक्षम

Next

नरेश पुगलिया : बल्लारपुरात पार पडला काँग्रेसचा मेळावा, इच्छुकांच्या मुलाखती
बल्लारपूर : भाजपा वाचाळविरांचा पक्ष आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी जनतेला मोठमोठी स्वप्न दाखविली. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यास केंद्र व राज्य सरकारला अद्याप यश आले नाही. यामुळे जनतेचा भ्रमनिराश झाला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत जनता काँग्रेसला मतदान करुन विजयी करणार, असा विश्वास व्यक्त करुन काँग्रेसची जनमानसातील प्रतिमा पारदर्शक व कार्यक्षम राहिली आहे, असे मत काँग्रेसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी येथे बुधवारी व्यक्त केले.
बल्लारपूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक बालाजी सभागृहात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन पुगलिया बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, युवा नेते राहुल पुगलिया, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, मजदूर सभेचे महासचिव वसंत मांढरे, टी. पद्माराव, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, दिलीप माकोडे, नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगराध्यक्ष डॉ. मधुकर बावणे, सुनंदा आत्राम, छबुताई मेश्राम, न.प.गटनेते देवेंद्र आर्य, नगरसेवक भास्कर माकोडे, शांताबाई बहुरिया, वंदना तामगाडगे, शोभा महतो, अ‍ॅड.मेघा भाले, तारासिंग कलशी, मनोहर फुलझेले, मनपा नगरसेवक अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, देवेंद्र बेले, नगरसेवक नासीर खान, अ‍ॅड. हरिश गेडाम आदींची उपस्थिती होती.
नरेश पुगलिया पुढे म्हणाले, काँग्रेसची जनमानसातील प्रतिमा पारदर्शक व कार्यक्षम राहिली आहे. यामुळेच आपण १९७८ पासून काँग्रेस पक्षात कार्यरत असून आपले प्रेरणास्थान माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी आहेत. तेव्हापासून ४० वर्ष काँग्रेसची सेवा केली. बल्लारपूर नगरपरिषद सार्वत्रीक निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढली जाणार आहे. काँग्रेसचे योग्य उमेदवार असतील, तरच आपण प्रचारात उतरु, असेही ते म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे. यासाठी नव्या जोमाने कामाला लागण्याची गरज आहे. आगामी नगरपरिषदेच्या सार्वत्रीक निवडणुकीनंतर बल्लारपूर शहरात काँग्रेस पक्ष सत्तारुढ होणार, असा विश्वास पुगलिया यांनी व्यक्त केला. संचालन नासिर खान यांनी तर आभार देवेंद्र आर्य यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

अध्यक्षपदासाठी आठ उमेदवारांची दावेदारी
बल्लारपूर नगरपरिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित आहे. यावेळी नगराध्यक्ष पदाची निवड थेट मतदार करणार आहेत. यामुळे नगरपरिषद सार्वत्रीक निवडणुकीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. यासाठी तब्बल आठ जणांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्याचप्रमाणे १६ प्रभागातील ३२ जागेवर ८२ उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे नगरसेवक पदाची उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज सादर केले. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याकडे अध्यक्ष व नगरसेवक पदाची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची यादी सुपूर्द करण्यात आली आहे.

Web Title: Congress's image is transparent and efficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.