बामणीत अपक्ष तर कोठारीत काँग्रेसची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:25 AM2017-10-19T00:25:09+5:302017-10-19T00:25:20+5:30
तालुक्यातील बामणी (दुधोली), कोठारी कवडजई, इटोली व काटवली (बामणी) येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल येथील तहसील कार्यालयात मतमोजणी करून मंगळवारी जाहीर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : तालुक्यातील बामणी (दुधोली), कोठारी कवडजई, इटोली व काटवली (बामणी) येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल येथील तहसील कार्यालयात मतमोजणी करून मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये बामणी (दुधोली) येथे युवाशक्तीप्रणीत सुभाष ताजणे तर कोठारी येथील ग्रामंपचायतीवर काँग्रेस महाआघाडीचे मोरेश्वर लोहे यांनी विजय मिळविला. तर कवडजई, इटोली व काटवली (बामणी) ग्रामपंचायतीवर भाजपाने घवघवीत यश संपादन केले.
बामणी (दुधोली) ग्रामपंचायत सरपंच पदासाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यात युवाशक्ती पॅनलचे सुभाष ताजने एक हजार १७८ मते घेवून सरपंचपदी निवडून आले. येथे भाजपाचे उमेदवार मनोजकुमार माणुसमारे ५६२ मते घेवून दुसºया तर काँग्रेसचे उमेदवार गंगाधर वरारकर २४५ मते घेत चवथ्या स्थानावर राहिले. येथे युवाशक्ती प्रणित सुभाष ताजने पॅनलचे नऊ ग्रामपंचायत सदस्य तर भाजपाला दोन व काँग्रेस व अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिकंली.
निवडून येणाºया ग्रामंपचायत सदस्यात प्रभाग एक अ- शेख जमीर, एक ब- वर्षा आलाम, प्रभाग दोन अ- दिलीप काटोले, ब- कमल कोडापे, प्रभाग तीन अ- संतोष टेकाम, ब- सुरेखा मडावी, क- आशा निकोडे, प्रभाग चार अ- श्रीहरी अंचूर, ब - स्वप्नील बोरकर, क- कौशल्या पेंदोर तर प्रभाग पाच अ- चंदू घाटे, ब- सुशील कुळसंगे, क- सुरेखा निब्रड यांचा समावेश आहे.
कोठारी येथील ग्रामपंचायत सरपंच काँग्रेसचे मोरेश्वर लोहे यांनी भाजपाचे उमेदवार सुनिल फ रकडे यांचेवर १०८ मताच्या फ रकाने विजय मिळविला.
मोरेश्वर लोहे यांना एक हजार ४६६ मते तर सुनिल फ रकडे यांना एक हजार ३५८ मते मिळाली. सरपंच व सदस्य पदासाठी निवडणुकीला सामोरे गेलेले. संजय खाडीलकर, चंद्रकांत राजूरकर व मारोती वांढरे यांना पराभवाचा समाना करावा लागला.
या ग्रामपंचायतीत प्रभाग एक अ- राहूल चहारे, ब- स्नेहल टिंबडीया, प्रभाग दोन अ- विलास राजूरकर, ब- विद्या देवाळकर, प्रभाग तीन अ- संजय सिडाम, ब- कल्पना वडघने, क- सायत्राबाई मोहुर्ले, प्रभाग चार अ- युवराज तोडे, ब- शिला वासमवार, क- विना तोरे तर प्रभाग पाच अ- माजी उपसरपंच अमोल कातकर, ब- विमलबाई खोब्रागडे, क- वंदना झाडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. कवडजई येथे सरपंचपदी भाजपाचे शालीकराम पेंद्राम यांनी काँग्रेसचे वामन पेंदोर यांचा पराभव करून निवडून आले. इटोली येथे भाजपाच्या मंगला सातपूते यांनी काँग्रेसच्या मायाबाई पिपरे यांचा पराभव केला. तर काटवली (बामणी) येथे सरपंचपदी भाजपाचे गिरीधर आत्राम यांनी रसिका तोडासे यांचा पराभव केला.