राजुºयात काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:13 AM2017-10-08T01:13:18+5:302017-10-08T01:13:34+5:30

सरकारच्या अकार्यक्षम धोरणाविरोधात काँग्रेसच्या वतीने माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात आज शनिवारी राजुºयात मोर्चा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

Congress's strength demonstration in Raju | राजुºयात काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन

राजुºयात काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन

Next
ठळक मुद्देसुभाष धोटे : अकार्यक्षम सरकारमुळे सामान्य जनतेचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : सरकारच्या अकार्यक्षम धोरणाविरोधात काँग्रेसच्या वतीने माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात आज शनिवारी राजुºयात मोर्चा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
मोर्चाला संबोधित करताना माजी आमदार सुभाष धोटे म्हणाले, खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या तीन वर्षांत जवळपास दुपटीने दरवाढ झाली आहे. सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. नोटाबंदी, जीएसटी यामुळे जीडीपी खालावून आर्थिक मंदी आणि महागाईचे चटके सर्वांना सोसावे लागत आहे. कागदी विकास उभा केला जातोय. पण राज्यात आज लोडशेडिंगचे सौभाग्य लाभले आहे आणि सरकारी आशिवार्दाने शेतकºयांवर विष फवारणी होत आहे. प्रकल्पग्रस्तांची होरपळ होतेय, सर्व सामान्यांची फसवणूक होत आहे.
शनिवारी सकाळी १० वाजता राजुरा येथील प्रसिद्ध भवानी मंदिर ते तहसील कार्यालयपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या काँग्रेस नेत्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. विशेष म्हणजे, यावेळी सरकारची प्रतिकात्मक शवयात्रा काढण्यात आली.
राजुराचे तहसीलदार रवींद्र होळी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना राजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या तातडीने सोडविण्यासाठी एक निवेदन देण्यात आले. यावेळी चंद्रपूर जिल्हा परिषद विरोधी पक्षाचे गटनेते डॉ. सतीश वारजूरकर, चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर, विनायक बांगडे, विनोद दत्तात्रय, सुभाष गौर, प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस डॉ. आसावरी देवतळे, चंद्रपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया, चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुनंदा जीवतोडे, दिनेश चोखारे, संतोष लहामगे, काँग्रेसचे चंद्रपूर विधानसभा प्रमुख महेश मेंढे, काँग्रेसचे राजुरा तालुका अध्यक्ष दादापाटील लांडे, कोरपना तालुका अध्यक्ष विठ्ठल थिपे, जिवती तालुका अध्यक्ष गणपत आडे, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे, काँग्रेसचे राजुरा विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यातील बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीच्या सभापती व सर्व सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, यासह काँग्रेसच्या सर्व विभागाचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Congress's strength demonstration in Raju

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.