ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जाणीव जागृती कार्यक्रम
By Admin | Published: September 21, 2015 12:48 AM2015-09-21T00:48:16+5:302015-09-21T00:48:16+5:30
थानिक विवेकानंद महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा ग्राहक पंचायत भद्रावतीद्वारे शुक्रवारी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भद्रावती: स्थानिक विवेकानंद महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा ग्राहक पंचायत भद्रावतीद्वारे शुक्रवारी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. एन. उमाटे, मार्गदर्शक शेखर घुमे (अ.भा. ग्राहक पंचायत कोषाध्यक्ष), जिल्हा संघटक मंत्री पुरुषोत्तम मत्ते, कार्याध्यक्ष वामन नामपल्लीवार, विठ्ठल ढवळे, बांबोळे व मेश्राम, रासेयोचे समन्वयक डॉ. यू. बोसरे उपस्थित होते. आपले लोकशाही राज्य असले तरी ग्राहकांचे शोषण विक्रेत्यांकडून होत राहते. त्यासाठी ग्राहक राजा जागा होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. एन. उमाटे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. जे. काकडे तर आभार प्रा. आर. पारेलवार यांनी मानले.
याप्रसंगी प्रा. डॉ. राखुंडे, प्रा. व्ही. टोंगे, डॉ. एस. तेलंग, डॉ. पी. तितरे, प्रा. ए. ठाकरे, तातोबा चौखे, सागर निरांजने, प्रियंका मांढरे, सुकेशीनी इनामे, मोहिना खाडे, स्नेहा हनवते, देविदास आडे, आशिष मल्लेलवार, प्रशांत दहोरकर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)