तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्‍या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:26 AM2021-05-16T04:26:32+5:302021-05-16T04:26:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : राज्‍यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्‍याचा अंदाज टास्‍क फोर्ससह अनेक तज्ज्ञांनी व्‍यक्‍त केला आहे. ...

Considering the danger of the third wave, effective measures should be taken | तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्‍या

तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्‍या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : राज्‍यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्‍याचा अंदाज टास्‍क फोर्ससह अनेक तज्ज्ञांनी व्‍यक्‍त केला आहे. त्यामुळे शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

चंद्रपूर तालुका ग्रामीण भागासाठी पाच तर चंद्रपूर महानगर क्षेत्रासाठी १५ अशा २० ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण आणि आर्य वैश्‍य स्‍नेह मंडळ, चंद्रपूर या संस्‍थेला एक रूग्‍णवाहिका भेट दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, महानगर भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, मनपाचे स्‍थायी समिती सभापती रवी आसवानी, सरचिटणीस राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, ब्रीजभूषण पाझारे, प्रकाश धारणे, संजय कंचर्लावार, संदीप आवारी, सचिन कोतपल्‍लीवार, विठ्ठलराव डुकरे, दिनकर सोमलकर उपस्थित होते.

जिल्‍हयात शासकीय रूग्‍णालयांमध्‍ये फक्‍त ८४ व्‍हेंटिलेटर उपलब्‍ध आहेत. ही संख्‍या वाढणे अत्‍यंत गरजेचे आहे. म्‍युकरमायकोसिसच्‍या रूग्‍णांना महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजनेत दीड लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्‍याची मागणी शासनाकडे केल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्याआधी आमदार मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्‍हा रूग्‍णालयाला १५ एनआयव्‍ही, २ मिनी व्‍हेंटिलेटर्स, १५ मोठे व्‍हेंटिलेटर्स, चंद्रपूर, मूल, बल्‍लारपूर, पोंभुर्णासाठी ३० ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्‍ध केले. त्‍यांच्‍या आमदार निधीतून बल्‍लारपूर नगर परिषदेला २ रूग्‍णवाहिका उपलब्‍ध केल्‍या. तसेच १०० पीपीई किट, ७० चश्‍मे वितरीत केले. बल्‍लारपूर शहरातील २०० भाजीपाला विक्रेत्‍यांना फेसशिल्‍डसह जीवनावश्‍यक वस्‍तूंचे किट वितरीत केले. कोविड काळात रूग्‍णांना ने-आण करण्‍यासाठी ५ रूग्‍णवाहिकांची सेवा निःशुल्‍क सुरू केली. १५०च्‍या वर ऑटोमेटिक सॅनिटायझर मशीन व सॅनिटायझर वितरीत केले, मास्‍क व फेसशिल्‍डचे वितरण केले. चंद्रपूर महानगराला १५ व तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागाला ५ असे २० ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर त्‍यांनी वितरीत केले. रूग्‍णसेवा हीच ईश्‍वरसेवा आहे. यापुढील काळातही भारतीय जनता पक्षाच्‍या माध्‍यमातून आमचे सेवाकार्य असेच सुरू राहणार असल्‍याचे आमदार मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. आर्य वैश्‍य स्‍नेह मंडळ, चंद्रपूर या संस्‍थेला त्‍यांनी रूग्‍णवाहिकेची प्रतिकात्‍मक चावी भेट देत रूग्‍णवाहिकेचे लोकार्पण केले. यावेळी राजेश सुरावार, जयंत बोनगीरवार, गिरीश उपगन्‍लावार, वैभव कोतपल्‍लीवार, अजय निलावार, विजय गंपावार, गिरीधर उपगन्‍लावार, डॉ. प्रसन्‍ना मद्दीवार, नीरज पडगिलवार, अविनाश उत्‍तरवार, आदी उपस्थित होते.

Web Title: Considering the danger of the third wave, effective measures should be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.