निर्लिखित इमारतीचे बांधकाम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:25 AM2021-02-07T04:25:48+5:302021-02-07T04:25:48+5:30
पिंपळगाव,(भो) : ब्रह्मपुरी तालुक्यातील लोकसंख्येत सर्वांत मोठे सहा हजार लोकसंख्या वस्तीचे व दरवर्षी वैनगंगा नदीच्या पुराने अतिसंवेदनशील वर्धिनी आरोग्य ...
पिंपळगाव,(भो) : ब्रह्मपुरी तालुक्यातील लोकसंख्येत सर्वांत मोठे सहा हजार लोकसंख्या वस्तीचे व दरवर्षी वैनगंगा नदीच्या पुराने अतिसंवेदनशील वर्धिनी आरोग्य केंद्राची इमारत मोडकडीस आली आहे. त्यामुळे रुग्णांचा जिवाला धोका निर्माण झाला असून, या इमारतीचे बांधकाम त्वरित करावे, अशी मागणी माजी जि. प. सदस्य नारायण ठेगरे यांनी केली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव, पिंपळगाव(भो) वैनगंगा नदीच्या पुराने व निसर्गाच्या प्रकोपाला बेजार झालेल्या २५ गावांचा या आरोग्य वर्धिनी केंद्राशी संबंध येतो. पावसाळ्यात या परिसरात साथीचे आजार वाढतात. त्यामुळे या आरोग्य केंद्रात रुग्णांची मोठी गर्दी होते. मात्र केंद्राची इमारत जिर्ण झाली असल्याने निर्लिखित करण्यात आली आहे. जागेअभावी डॉक्टरांना रुग्णांना समाधानकारक सेवा देता येत नाही. त्यामुळे या इमारतीचे त्वरित बांधकाम झाले, तर डॉक्टरांना चांगली सेवा देता येईल व गरीब रुग्णाचे पैसे वाचविता येईल. त्यामुळे या निर्लिखित इमारतीचे बांधकाम त्वरित करा, अशी मागणी माजी जि.प. सदस्य नारायण ठेंगरी यांनी केली आहे.