जिल्ह्यात खतनिर्मिती कारखाना उभारणार
By admin | Published: November 15, 2014 10:44 PM2014-11-15T22:44:27+5:302014-11-15T22:44:27+5:30
आगामी पाच वर्षामध्ये जिल्ह्यात खतनिर्मिती कारखाना उभारून जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात रसायन व खते
गांधी चौकात जनसागर उसळला : हंसराज अहीर यांचे सत्काराला उत्तर
चंद्रपूर : आगामी पाच वर्षामध्ये जिल्ह्यात खतनिर्मिती कारखाना उभारून जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात रसायन व खते राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी सोपविवली. त्या संधीचे सोने करून शेतकऱ्यांना या विभागामार्फत कसा लाभ देता येतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत ना.हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.
मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यानंतर प्रथमच ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचा गांधी चौकात भव्य सत्कार करणार आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अतुल देशकर, आमदार अॅड. संजय धोटे, आमदार राजू तोडसाम, आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, माजी पालकमंत्री संजय देवतळे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपाचे महानगराध्यक्ष विजय राऊत, राजेश मून, राजेंद्र अडपेवार, चंद्रकांत गुंडावार आदी उपस्थित होते.
मतदारांनी चार वेळा लोकसभेत पाठविले. त्यामुळेच मंत्रीपदाची संधी मिळाली. मला मिळालेल्या मंत्रीपदाचे श्रेय हे माझे नाही तर, मतदारांचे आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर नागरिकांनी काँग्रेसचे सरकार उलथवून भाजपाकडे सत्ता सोपविली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त देश निर्माण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. देशातील सर्वात मोठा कोळसा घोटाळा बाहेर काढल्यामुळे नागरिकांकडून माझ्या अपेक्षा वाढत्या आहेत. त्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माझ्याकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. उपस्थितांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी महानगर भाजपातर्फे पुष्पहार घालुन ना. अहीर यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर महानगररातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने सत्कार केला. यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( नगर प्रतिनिधी)