राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे बांधकाम तीन महिन्यांपासून ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:42 AM2019-05-12T00:42:34+5:302019-05-12T00:43:12+5:30
केंद्र सरकारने उमरेड-चिमूर-वरोरा क्रमांक ३५३ (इ) या राष्ट्रीय महामार्गाचे ेचौपदरीकरण करण्याचे काम सुरू केले. पण मागील तिन महिन्यांपासून काम थंडबस्त्यात आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना जीव धोक्यात घालून या मार्गावरून जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : केंद्र सरकारने उमरेड-चिमूर-वरोरा क्रमांक ३५३ (इ) या राष्ट्रीय महामार्गाचे ेचौपदरीकरण करण्याचे काम सुरू केले. पण मागील तिन महिन्यांपासून काम थंडबस्त्यात आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना जीव धोक्यात घालून या मार्गावरून जावे लागत आहे.
उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दोन मोठ्या कंपन्याना होते. यापैकी उमेरड- चिमूर मार्गचे काम स्थितीत सुरू आहे. परंतु, चिमूर-वरोरा मार्गाचे काम रखडल्याचे दिसून येत आहे. चिमूर- वरोरा हा मार्ग पूर्णत: खोदण्यात आला. या ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. पण मागील दीड वर्षाच्या काळात या मार्गाची एक बाजूही तयार करण्यात संबधित यंत्रणेला यश आले नाही. बांधकाम सुरू असताना त्यावर पाणी मारण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकााां मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर पसरविण्यात आलेल्या गिट्टीमुळे दररोज अपघात घडत आहेत. यामध्ये आतापर्यंत अनेकांना अपंगत्व आले. मार्गाच्या बांधकामाचे कंत्राट वारंवार विविध कंपन्यांना हस्तांतरीत केल्या जाते. मागील तीन महिन्यांच्या काळापासून बांधकाम प्रक्रिया पूर्णत: ठप्प आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले. शिवाय लोकप्रतिनिधीही बघ्याची भूमिका घेत असल्याने वाहनधारक व परिसरातील विविध गावांतील नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. उमरेड- चिमूर -वरोरा हा मार्ग अतिशय वर्दळीचा असल्याने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. मार्गाचे चौपदरीकरण व अन्य कामे पूर्ण झाली असती तर विकासाला चालना मिळाली असती. पण मागील तीन महिन्यांपासून बांधकाम जैसे थे आहे. त्यामुळे महामार्गाच्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता आशिष आवळे यांच्याशी संपर्क साधला परंतु होऊ शकला नाही.
रुग्णांसाठी धोकादायक
चिमूर तालुक्यात आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध नसल्याने रूग्णांना चंद्रपूर व नागपूर येथे दाखल करावे लगाते. गर्भवती महिलांना याचा सर्वाधिक फटका बसतो. या मार्गावर जागोजागी खड्डे असल्यामुळे रुग्णालयात पोहोचताना संकटांचा सामना करावा लागतो. प्रशासनाने चौपदीकरणाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.