कोठारीत निकृष्ट सिमेंट रस्ता बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:34 AM2018-03-15T01:34:02+5:302018-03-15T01:34:02+5:30

बल्लारपूर तालुक्यातील कोठारी ग्रा.पं. हद्दीत जि.प. कडून कंत्राटदारामार्फत सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असून सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून बांधकामासाठी अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

Construction of ultra-cement road in Kothari | कोठारीत निकृष्ट सिमेंट रस्ता बांधकाम

कोठारीत निकृष्ट सिमेंट रस्ता बांधकाम

googlenewsNext
ठळक मुद्देचौकशीची मागणी : रस्त्याच्या बांधकामासाठी अवैध रेतीचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी ग्रा.पं. हद्दीत जि.प. कडून कंत्राटदारामार्फत सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असून सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून बांधकामासाठी अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत कार्यालय ते अनवर अली यांच्या घरापर्यंत जि.प. कडून सिमेंट रस्त्याचे बांधकाम मंजूर झाले असून त्याचे काम सुरू आहे. सदर काम अंदाजपत्रकात नमूद असल्याप्रमाणे होत नसून अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामावर संबंधित अभियंता हजर राहात नसल्याने कंत्राटदार मनमर्जीने काम करीत आहे. रस्त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, अल्प प्रमाणात सिमेंट वापरले जात असल्याने कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी काम बंद पाडले व संबंधितांना तक्रार करून झालेल्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी केली. जोपर्यंत अंदाजपत्रकाप्रमाणे काम करण्याची हमी मिळत नाही, तोपर्यंत काम करण्यावर बंदी घातली आहे. या कामाकडे आता वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

ग्रा.पं. कार्यालय ते अनवर अल्ली यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम सुरू असून कंत्राटदार मनमर्जीने निकृष्ट काम करीत असल्याचा प्रकार प्रत्यक्ष दिसून आला. तसेच या बांधकामासाठी गावातील ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक केली जात आहे. याच रेतीचा वापर या कामावर होत असल्याचा प्रकार उघडपणे सुरू आहे. रस्त्याच्या बांधकामाची व अवैध रेतीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- धीरज बांबोडे, जिल्हा महासचिव, भारिप बमसं.
रस्त्याच्या कामावर अवैध रेतीचा वापर
कोठारीत सुरू अससलेला सिमेंट रस्त्याच्या कामावर कोठारी परिसरातील महसूल तथा वनविभागाच्या क्षेत्रातून अवैध रेतीचा उपसा करून वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडाला असून ३० ते ४० ब्रास रेती जमा करून ठेवण्यात आली आहे. याबाबत कोठारीचे तलाठी कन्नाके यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी साठविलेल्या रेतीचा व बोल्डरचा पंचनामा केला व कारवाईसाठी संबंधित अधिकाºयांकडे पाठविल्याचे सांगितले.

Web Title: Construction of ultra-cement road in Kothari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.