अनियमित वीज पुरठ्याने ग्राहक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:29 AM2021-04-27T04:29:34+5:302021-04-27T04:29:34+5:30
मोकाट जनावरांमुळे अपघाताची शक्यता चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील काही वाॅर्डामध्ये मोकाट जनावरांमुळे अपघाताची शक्यता आहे. या जनावरांचा ...
मोकाट जनावरांमुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील काही वाॅर्डामध्ये मोकाट जनावरांमुळे अपघाताची शक्यता आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
बचतगटही आले अडचणीत
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश बचतगटही अडचणीत आले आहेत. काही बचतगटातील सदस्यांना उचललेले कर्जच भरता आले नाही.
सराई मार्केट परिसरात अस्वच्छता
चंद्रपूर : शहरातील सराई इमारत परिसरामध्ये कचरा टाकल्या जात असल्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. परिणामी, परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
पेन्शनमध्ये वाढ करावी
चंद्रपूर : खासगी कंपन्या, महामंडळे, सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून पेन्शन मिळत आहे. मात्र ते अत्यल्प आहे. सध्या कोरोनामुळे अडचण असल्याने पेन्शनमध्ये वाढ करावी.
महागाई वाढल्याने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना लॉकडाऊन सातत्याने महागाई वाढत आहे. सिलिंडर, तेल, साखर आदी जीवनावश्यक वस्तूच्या किमतीत वाढ झाली आहे. यासोबतच इतरही साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. महागाई कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
बाबूपेठ परिसरात घाणीचे साम्राज्य
चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: बाबूपेठ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी कचरा साचला आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी
चंदपूर : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रेडियम लावण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रत्येक रस्त्यावर रेडियम लावून अपघात टाळावा, अशी मागणी सहयोगी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे रहदारी कमी झाली आहे. त्यामुळे आता हे काम करणे सहज शक्य आहे.
धोकादायक चेंबर दुरुस्त करावे
चंद्रपूर : शहरात काही ठिकाणी उघडे चेंबर आहेत. हे चेंबर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. त्यामुळे दुरुस्तीची मागणी केली जात आहे. आता लॉकडाऊनमुळे रहदारी कमी असल्याने या काला गती द्यावी, अशी मागणी आहे.
व्यावसायिकांचे रस्त्यावर अतिक्रमण
चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर मार्गावरील जनता काॅलेज चौक ते वडगाव फाट्यापर्यंत काही व्यावसायिक नव्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना विक्रीसाठी रस्त्यावर ठेवतात. त्यामुळे रस्ता मोठा असूनही अनेकवेळा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता लॉकडाऊन असल्याने हे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी आहे.
नियमीत पाणीपुरवठा करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील सिस्टर कॉलनीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते.