ग्राम जनजीवन जागृती अभियानातून कर्तव्याची जाणीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:28 PM2018-01-10T23:28:49+5:302018-01-10T23:30:13+5:30
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. तर ग्रामीण भागात शिक्षणाच्या योग्य सुविधा नसल्याने ग्रामीण भाग माघारला आहे.
आॅनलाईन लोकमत
चिमूर : स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. तर ग्रामीण भागात शिक्षणाच्या योग्य सुविधा नसल्याने ग्रामीण भाग माघारला आहे. नागरिकांना संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्य माहित नाही़ त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक योजनांपासून वंचित आहेत. अशा वंचितांना अधिकार व कर्तव्याची जाणिव करून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य गजानन बुटके यांच्या कल्पनेतून ग्राम जन-जीवन जागृती अभियान राबविण्यात येत आहे़
शासनाद्वारे ग्रामीण भागात अनेक योजना राबविण्यात येतात़ मात्र त्या योजना लाभार्र्थांपर्यत पोहोचत नाहीत़ योजनांची योग्य माहिती लाभार्थ्यांंस नसल्याने विकासापासून दूर राहावे लागते़ कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अनेक योजना रखडेल्या आहेत़ या योजना नागरिकांपर्यत पोहचविणे आणि गावाच्या विकासात भर टाकण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
ग्राम जन - जीवन जागृती अभियान मासळ आणि मदनापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील २१ ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे़ या अभियानाची सुरुवात ८ जानेवारीला पिपर्डा ग्रामपंचायतींपासुन करण्यात आली़ हे अभियान सायंकाळी ५ वाजता स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात येणार आहे त्यामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे़ दुसऱ्या दिवशी ग्रामस्वच्छता अभियान राबून गावकऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली जाते़ अभियानाची सांगता २२ जानेवारीला होणार आहे़ या उपक्रमामुळे नागरिकांना लोकशाहीचे धडे मिळणार आहे.
यांचा राहणार सहभाग
अभियानात जि.प सदश्य गजानन बुटके , सरपंच, उपसरंपच, ग्रा़ पं़ सदस्य, पचायंत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, परिचारिका, तलाठी, कृषी सहाय्यक, विद्युत सेवक, वनरक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा समावेश राहणार आहे़
या विषयांवर होणार मार्गदर्शन
आपले कर्तव्य, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, कोरडा आठवडा , स्वछ ग्राम अभियान, जल सवंर्धन, आहार, शिक्षण, कुपोषण, माता, बाल संगोपन, महिला सबलीकरण लसीकरण, कुंटुब नियोजन, मातामृत्यु, बाल मृत्यु, साथीचे रोग, पशुसंवर्धन तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार आहे़ या अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते़