ग्रामीण डाक सेवकांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:13 PM2018-12-21T23:13:54+5:302018-12-21T23:14:31+5:30

अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवा युनियनने कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू कराव्या, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये संपूर्ण चंद्रपूर जिल्हा सहभागी झाल्याने सर्व ग्रामीण डाकसेवा बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Contact of Rural Postal Service | ग्रामीण डाक सेवकांचा संप

ग्रामीण डाक सेवकांचा संप

googlenewsNext
ठळक मुद्देमागण्यांची पूर्तता करा : नागरिकांची कामे प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवा युनियनने कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू कराव्या, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये संपूर्ण चंद्रपूर जिल्हा सहभागी झाल्याने सर्व ग्रामीण डाकसेवा बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामीण डाकसेवा युनियनने यापूर्वीसुद्धा आपल्या मागण्यांसाठी १६ दिवसांचा संप पुकारला होता. त्यावेळी सर्व कर्मचारी सहभागी झाल्याने डाक व्यवस्थापनानी मागण्या मान्य केल्या होत्या. परंतु, डाक विभागाने कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण केल्या नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष पसरला आहे. परिणामी कर्मचाºयांनी पुन्हा एकदा हत्यार उपसले आहे.
१ जानेवारी २००६ पासून देय असलेली अंतरिम वेतन वाढ लागू करावी, एरियस मुल्यमापन कमिटीच्या शिफारशीनुसार करावे, १२, २४ व ३६ वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना शिफारशीप्रमाणे वार्षिक वाढ करावी, ग्रेच्युयुटी पाच लाख रुपये करावी, पेंशन निधीत दहा टक्के कपात करावी, स्वेच्छानिवृती त्वरित लागू करावी, ३० दिवसांची रजा देण्यात यावी, कमिटीच्या शिफारशीप्रमाणे बदलीचे आदेश काढावेत, एक कर्मचारी असलेले डाक दोन कर्मचारी करण्यात यावी, सर्व जीडीएस कर्मचाºयांना नियमित कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा आदी मागण्यांसह कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू कराव्या यासाठी बेमुदत संप पुकारण्यात आला होता. चंद्रपूर जिल्ह्यात हा संप शंभर टक्के यशस्वी झाला असून ग्रामीण भागातील पोष्टमास्तर, पोष्टमन व डाक वाहक या संपात सहभागी झाल्याचे डाक युनियनच्या नेत्यांनी सांगीतले. यावेळी डाक संघटनेचे सचिव नितीन ठाकरे, ग्रामीण सचिव मुरलीधर बोडखे, किसन चिकनकर, शंकर निवलकर, पंढरी झाडे, राजू धोटे, मुरलीधर मटाले, रमजान पठाण, सुरेश वाटेकर, कवडू चटकी, नितेश सांगडे उपस्थित होते.

Web Title: Contact of Rural Postal Service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.