कोलाम बांधव पितात नाल्यातील दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:10 PM2018-05-22T23:10:49+5:302018-05-22T23:11:08+5:30

तालुक्यातील बगलवाही या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील वन जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्य करणारे आदिवासी वनवासी कोलाम आजही नाल्यातील झऱ्याच्या पाण्यावर जीवन जगत आहे.

Contaminated water in the Nallah drinks Kollam brother | कोलाम बांधव पितात नाल्यातील दूषित पाणी

कोलाम बांधव पितात नाल्यातील दूषित पाणी

Next
ठळक मुद्देसवलतीपासून वंचित : हातपंप खोदकामाला वनविभागाची आडकाठी

आनंद भेंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : तालुक्यातील बगलवाही या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील वन जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्य करणारे आदिवासी वनवासी कोलाम आजही नाल्यातील झऱ्याच्या पाण्यावर जीवन जगत आहे. त्यांना शासनातर्फे मुलभूत सोयी सवलती पंचायत समितीकडून देण्याचा प्रयत्न वनविभागाच्या राखीव वनामुळे असफल ठरला आहे. त्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हातपंप सुद्धा खोदण्यास मनाई केल्यामुळे सुमारे १० वर्षांपासून नाल्याच्या पाण्यावर जीवन जगत आहे. त्यामुळे आतापर्यंत तेथील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
बगलवाही हे जुने रिठ असून कोलामांच्या वास्तव्याचे बºयाच वर्षापुर्वी ठिकाण होते. परंतु त्यांच्या रितीरिवाजाप्रमाणे एखादा व्यक्ती मरण पावल्यास स्थानांतर करणे, ही त्याची प्रथा आहे. सध्या बगलवाही येथे दोन गुड्यात जवळपास ३५-४० घरे असून २०० लोकांची संख्या आहे. सन २००० मध्ये डोंगरगाव धरणाच्या बुडीत क्षेत्रात त्याच्या जमिनी गेल्यामुळे इतरत्र स्थानांतर झाले. काही कोलामांचे मूर्ती या गावी शासनाने स्थानांतर केले. कोलामांचे वास्तव्य सामान्य जनतेपासून दूर राहणे, जंगलापासून जीवन जगणे ही त्यांची संस्कृती आहे. जंगलातील बांबूपासून तट्टे, ताटवे बनवून आपली उपजिविका करतात. तसेच थोड्या फार वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती करतात. याच उद्देशाने बगलवाही येथील वन जमिनीवर अतिक्रमण करून जीवन जगत आहेत.
सन २०११ मध्ये बगलवाही येथील कोलामांचे घर उद्ध्वस्त करून त्यांना बेघर करण्यात आले होते. परंतु श्रमिक एल्गारच्या नेत्या पारोमिता गोस्वामी यांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यामुळे त्यांना त्याच जागेवर स्थायी करण्यात आले. त्यानंतर मुलभूत सोयी सवलती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी व पंचायत समिती राजुराकडून करण्यात आले. परंतु, वन विभागाकडून त्यांना मनाई करून ग्रा.पं.कडून लावलेले सौर उर्जाचे लाईट जुलै २०१६ मध्ये काढण्यात आले. हातपंप खोदण्यासाठी पाठविलेली गाडी सुद्धा परत आली. त्याचा परिणाम आजही नागरिक नाल्यात खड्डा खोदून झºयाच्या पाण्यावर जीवन जगत आहे. हे वास्तव्य आहे. त्यामुळेच आजपर्यंत विविध आजाराने येथील नऊ जणांचा मृत्यू झाला.

कोस्टाळा ग्रामपंचायतने पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभेत ठराव पास करून स्वतंत्र गुडा घोषीत करण्याची मागणी जिल्हाधिकारी व वनविभागाकडे केली आहे. तसेच भौतिक सुविधा पुरविण्यासाठी मंजुरी देण्याची मागणी केली आहे. वन जमिनीवर अतिक्रमण असल्यामुळे भौतिक सुविधा पुरवण्यासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्राअभावी आजही जैसे थे स्थिती आहे.
- डॉ. ओमप्रसाद रामावत,
गट विकास अधिकारी, पंचायत समिती, राजुरा.

Web Title: Contaminated water in the Nallah drinks Kollam brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.